शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीचा राजीनामा मंजूर

By admin | Updated: May 28, 2016 02:09 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद देशमुख यांना सभापतीपदावरून पायउतार करीत त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करीत समितीच्या सभासदांनी ठराव घेतला होता.

वर्धा बाजार समिती : सभासदत्वाचा फैसला ३१ मे रोजी
वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद देशमुख यांना सभापतीपदावरून पायउतार करीत त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करीत समितीच्या सभासदांनी ठराव घेतला होता. त्यावर देशमुख यांनी शुक्रवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास उपनिबंधक कार्यालयात राजीनामा सादर केला. त्यावर कुठलीही हरकत न घेता तो जिल्हा उपनिबंधकांनी मंजूर केला. तर वर्धा बाजार समितीचा प्रभार उपसभापती पांडुरंग देशमुख यांच्याकडे सोपविला.
देशमुख यांचे बाजार समितीचे सभासदत्व रद्द करण्याच्या मागणीवर चौकशी सुरू आहे. त्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. या दिवशी सदर प्रकरण बंद करण्यात येणार असून यानंतर किमान चार ते पाच दिवसांनी त्यांच्या सदस्यत्वाबाबत फैसला सुनावण्यात येणार असल्याची माहिती उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधातील ठरावावर स्वाक्षरी घेणाऱ्या सर्वच १६ सदस्यांचे लक्ष या निकालाकडे आहे.
वर्धा बाजार समितीत गत दीड महिन्यांपासून या सभापतीवर अविश्वासाच्या हालचाली सुरू होत्या. यात एका सभेत सर्वच सदस्यांनी एकत्र येत सभापती शरद देशमुख यांच्याविराधात कामात अनियमितता असल्याचा ठपका ठेवत ठराव घेतला होता. त्या ठरावावर १८ पैकी १६ सदस्यांनी स्वाक्षरी केली होती. यात काही देशमुख यांच्या गटाचेही सदस्य होते. तो ठराव मान्य करीत उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. यातच दबाव वाढत असल्याने सभापती शरद देशमुख यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. राजीनाम्याच्या निर्णयानंतर सभासदांनी उपनिबंधक कार्यालयाबाहेर जल्लोश साजरा केला. यावेळी बाजार समितीचे सभासद रमेश खंडागळे, श्याम कार्लेकर, जगदीश म्हस्के, विजय बोंडेवार, दत्ता महाजन, पवन गोडे, कमलाकर शेंडे, शरद झाडे, भूषण झाडे, मुकेश अरसपुरे, सुवर्णा मेघे, अरविंद भुसारी, प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

२६ वर्षांपासूनची सत्ता मोडकळीस

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीवर सन १९८८ पासून शरद देशमुख सतत सभापती म्हणून सत्तेत होते. यापूर्वी बराच काळ ते उपसभापती म्हणूनही कार्यरत असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. यामुळे वर्धेची बाजार समिती देशमुख यांचीच अशी ओळख झाली होती. त्या काळापासून पहिल्यांदा सभापतीवर अविश्वास आला. शिवाय त्यांचे सदस्यत्वही धोक्यात आले आहे. यामुळे तब्बल २६ वर्षानंतर त्यांच्या एकछत्री सत्तेला छेद मिळाल्याची चर्चा परिसरात होती.