शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा

By admin | Updated: August 24, 2014 00:09 IST

महाराष्ट्र शासनाच्या एमएसबीटीई अभ्यासक्रमातील एस.सी., एस.टी., ओ.बी.सी., व्हि.जे.एन.टी. तसेच अपंग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनेचा बनावट दस्ताऐवजा आधारे

वर्धा: महाराष्ट्र शासनाच्या एमएसबीटीई अभ्यासक्रमातील एस.सी., एस.टी., ओ.बी.सी., व्हि.जे.एन.टी. तसेच अपंग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनेचा बनावट दस्ताऐवजा आधारे जिल्ह्यातील तथा कथित शिक्षण माफियांनी ६६ कोटी २६ लाख ६६ हजार ३५८ रुपयांचा अपहार केला. जिल्ह्यातील शंभरावर एमएसबीटीई अभ्यासक्रम चालविणाऱ्या शिक्षण माफियांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची व संपत्तीची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. भास्कर इथापे यांनी एका निवेदनामार्फत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली. सदर प्रकरणाची शासनाने सीबीआयमार्फत चौकशी करण्यास टाळाटाळ केल्यास उच्च न्यायालयात जाणार असल्याचे प्रा. इथापे यावेळी म्हणाले. २००१ ते २०१० तसेच २०१० व ११, १२ या सत्रवत बनावट दस्ताऐवजाच्या आधारे शिष्यवृत्तीची उचल केल्याचे महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालात नमूद आहे. जिल्ह्यातील शंभरावर संस्था चालकांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांशी संगनमत करून शासनाच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयाचा चूना लावला. या बाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविल्याने त्रिसदस्यीय समिती मार्फत चौकशी केली. समितीने चौकशी अहवाल सामाजिक न्याय विभागाकडे सादर करून सहा महिने लोटले तरीही जिल्ह्यातील शिक्षण माफियांच्या विरूद्ध कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप इथापे यांनी केला. शैक्षणिक क्षेत्रात नामवंत म्हणून शेखी मिळविणाऱ्या शिक्षण संस्थाधिशांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवत सदर रक्कम वसूल पात्र रक्कम म्हणून अहवालात नोंदविली असली तरीही तिच्या वसुलीची कुठलीही चिन्हे नाहीत.(कार्यालय प्रतिनिधी)