शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

जागेअभावी गुरांचा बाजार धोक्यात

By admin | Updated: May 10, 2017 00:45 IST

समुद्रपूर तालुकास्थळावरील बाजार हा परिसरातील नागरिकांकरिता पर्वणी ठरणारा आहे. येथे भरणारा गुरांचा बाजारही हिच ओळख ठेवून होता.

बाजाराच्या जागेवर शासकीय कार्यालयांचे अतिक्रमण : १९५१ पासूनचा इतिहास लुप्त होण्याच्या मार्गावर सुधीर खडसे। लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर तालुकास्थळावरील बाजार हा परिसरातील नागरिकांकरिता पर्वणी ठरणारा आहे. येथे भरणारा गुरांचा बाजारही हिच ओळख ठेवून होता. आज वाढत्या सुविधांमुळे हा बाजार लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. बाजाराच्या जागांवर शासकीय कार्यालयाच्या इमारतींनी अतिक्रमण केल्याने बाजार धोक्यात आला आहे. येथील बाजाराची परंपरा ठिकठिकाणी यात्रेसारखीच आहे. लोकांच्या उपजीविकेसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीचा हा दिवस मुख्य मानल्या जात होता. या बाजारात विविध जातीची जनावरे, शेतीपयोगी वस्तू, बोरे, फाटे, टोपले यासाठी ख्यातीप्राप्त आहे. हा बाजार भरण्याला जनपत सभेच्या काळापासून (१९५१) प्रारंभ झाला असून भोसले महाराज यांचा बाजाराला राजाश्रय लाभला होता. आठ एकर परिसरात भरत आलेल्या या भव्य बाजाराची महाराष्ट्र शासनाच्या गॅजेट मध्ये नोंद आहे. दोन दशकापूर्वी गीर, लालकंधार, गवळाऊ, पंढरपूरी, जरशी, मुरर्रा अशा गायी, म्हशी, शेळ्या व बैलांच्या वेगवेगळ्या जाती मोठ्या प्रमाणात विदर्भ, मराठवाडा, नायगाव, मोहोपा, हाडी अशा विविध ठिकाणाहून समुद्रपूर येथे खरेदी विक्री साठी येत होते. शेतोपयोगी जनावरे व इतर साहित्य खरेदीविक्रीकरिता शेतकरी हजेरी लावत. आता या बाजाराच्या जागेवर तहसील, ट्रेझरी, भूमी अभिलेख कार्यालयाने कब्जा केला आहे. तहसील कार्यालयाने पक्की सरंक्षण भिंत उभारून बैलबंडीचा मुख्य रस्ता बंद केला. याबाबत नगरपंचायत उपाध्यक्ष रवींद्र झाडे, पाणीपुरवठा सभापती गजानन राऊत, गटनेता मधुकर कामडी यांनी तहसीलदार व आमदारांना रस्ता ठेवण्याबाबत निवेदन दिले आहे. दुसरीकडे बाजारात येण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर दुकानदाराने आपली दुकाने पुढे सरकवीत रस्त्यावर साहित्य ठेवल्याने हा रस्ता अरूंद झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यशून्यतेमुळे हा बाजार धोक्यात आला आहे.