शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

वाटणीपत्रातील अटी रद्द करा

By admin | Updated: September 6, 2014 02:17 IST

१०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर शेतीचे वाटणीपत्र करण्यासाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी कृषी ग्राहक संरक्षण समिती व किसान ...

समुद्रपूर : १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर शेतीचे वाटणीपत्र करण्यासाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी कृषी ग्राहक संरक्षण समिती व किसान अधिकार अभियान संघटनेमार्फत जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपसी वाटणीपत्र करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २६ जून २०१४ ला काढण्यात आलेल्या परिपत्रकात काही जाचक अटी असून त्यामध्ये वडिलोपार्र्जित जमीन वारसामध्ये वाटणी करता येणार आहे. परंतु स्वकष्टार्जित जमिनीचे वाटणीपत्र करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले होते. ही अट रद्द करून स्वकष्टार्जित जमिनीचे वाटणीपत्र सुद्धा १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.१०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर तहसीलदारांसमोर वाटणीपत्र केल्यानंतर भविष्यात वाद उत्पन्न होऊन न्यायप्रविष्ट झाल्यास सदर वाटणीपत्र कोर्टात ग्राह्य धरल्या जाणार नाही. तसेच एक टक्का नोंदणी फी भरूनच वाटणीपत्र करावे. या परिपत्रकातील दोन्ही अटी रद्द करण्यात याव्या. कारण दोन साक्षीदार व तहसीलदार यांच्या समक्ष रीतसर वाटणीपत्र केल्यावर ते कोर्टात ग्राह्य धरलेच पाहीजे. तसेच शंभर रूपयांच्या स्टॅम्पवर वाटणीपत्र केल्यानंतर एक टक्का नोंदणी फी आकारणे सुसंगत नाही. त्यामुळे या दोन्ही अटी रद्द करण्यात याव्या, अशी मागणी यावेळी संघटनांच्या वतीने करण्यात आली. १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आलेले वाटणीपत्र फेरफार करण्यासाठी तलाठ्याकडे हेक्टरी ५०० रूपये जमा करावे ही परीपत्रकातील अटसुद्धा शासनाच्या निर्णयाशी विसंगत असून ती रद्द करण्यात यावी तसेच जाचक अटी कमी करून सुधारित परिपत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी काढावे, अशी मागणीही कृषी ग्राहक संरक्षण समिती व किसान अधिकार अभियान संघटनेमार्फत करण्यात आली.(शहर प्रतिनिधी)