शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

तितली भोवरा खेळातून होत होती पैशाची हार-जीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:30 AM

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर्धा रेल्वे स्थानकासमोर तितली भोवरा खेळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून तब्बल ४३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोखसह ३.५४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ठळक मुद्दे४३ जुगाऱ्यांना अटक : रोखसह ३ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर्धा रेल्वे स्थानकासमोर तितली भोवरा खेळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून तब्बल ४३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोखसह ३.५४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर ४३ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जि.प. सदस्य उमेश जिंदे हा त्याचा भाऊ राजेंद्र जिंदे व इतर काही नोकरांच्या मदतीने वर्धा रेल्वे स्टेशन जवळील परिसरात मोकळ्या जागेवर तितली भोवरा खेळाच्या माध्यमातून जुगार भरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकून जुगार खेळताना राजेंद्र जिंदे, राहुल सूर्यवंशी, गोपाल वानखेडे, ललीत पांडे, राजेश मुजबैले, गोपाल भंडारी, प्रकाश ताकसांडे, निलेश बोरसरे, अतुल राऊत, गणेश गेडाम, सुशील भडके, मनोज सिडाम, रवी करमरकर, किशोर लोंढेकर, संदीप भेंडारे, सुमीत सोनटक्के, निखील तुमडे, अमोल नेहारे, प्रकाश गायकवाड, ईस्माईल नझीर शेख, शंकर हजारे, गजानन बनकर, पवन उमरे, कृष्णा डोळ, प्रमोद नाडे, रविंद्र जगताप, जगत राकडे, दीपक बाकडे, शेख इस्राईल शेख अहमद, प्रणय देशभ्रतार, प्रदीप बुलकुंडे, शुभम खंडारे, ईश्वर जाधव, नितेश बादलमवार, पंजाब ठाकरे, यासिन ईस्राईल खान, भुषण वैद्य, कृष्णकुमार गुप्ता, पद्माकर डुकरे, पांडुरंग धोटे, अजय ठाकुर रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून पोलिसांनी रोख १ लाख ८ हजार ७६० रुपये व ३० मोबाईल तसेच डावावरील रोख ७०,२२० रुपयेव इतर साहित्य असा एकूण ३ लाख ५४ हजार ९८० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सदर आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गादर्शनात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक ढोले यांच्या नेतृत्त्वात पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, आशीष मोरखेडे, अशोक साबळे, नामदेव किटे, सलाम कुरेशी, निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, दीपक जाधव, राजेंद्र ठाकुर, स्वप्नील भारद्वाज, हरीदास काकड, जगदीश डफ, संजय बोगा, रामकृष्ण इंगळे, मनीष श्रीवास, तुषार भुते, अमित शुक्ला, वैभव कट्टोजवार, हितेंद्र परतेकी, राकेश आष्टनकर, प्रदीप वाघ, रितेश शर्मा, विकास अवचट, संघसेन कांबळे, चंद्रकांत कोहचडे, विशाल शेंडे, उदय दाते, भुषण भोयर, बालाजी मस्के, चेतन पापडे, राठोड आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी