शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी रुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 05:00 IST

बसगाड्यांमध्ये पॉपकॉर्न, खारे दाणे व अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्यांनाही मोठा फटका बसला.  अनलॉकनंतर एस.टी.ची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून व्यावसायिकांचे व्यवसाय सुरळीत होत असल्याने संसाराची गाडीही पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक आगारातून दररोज २१५ फेऱ्या होत आहेत. बसस्थानकावर असलेल्या स्नॅकबारसह इतर भाड्यापोटी महामंडळाला १५ हजार ४५८ रुपये मासिक उत्पन्न मिळत आहे. 

देवकांत चिचाटेलोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : मागील दीड वर्षापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे तब्बल पाच महिने एस.टी.ची चाके जागीच थांबली होती. यंदाही कोरोनाने कहर केल्याने तब्बल ४५ दिवस एस.टी.ची प्रवासी वाहतूक बंद होती. याचा बसस्थानक आणि बसगाड्यांमध्ये पॉपकॉर्न, खारे दाणे व अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्यांनाही मोठा फटका बसला.  अनलॉकनंतर एस.टी.ची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून व्यावसायिकांचे व्यवसाय सुरळीत होत असल्याने संसाराची गाडीही पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक आगारातून दररोज २१५ फेऱ्या होत आहेत. बसस्थानकावर असलेल्या स्नॅकबारसह इतर भाड्यापोटी महामंडळाला १५ हजार ४५८ रुपये मासिक उत्पन्न मिळत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने मागील वर्षी तब्बल पाच महिने, तर या वर्षी दीड महिना एस.टी. बंद होती. यामुळे व्यवसाय ठप्प झाला होता. आता एस.टी. सुरळीत सुरू झाल्याने आर्थिक घडी पूर्वपदावर येत आहे.

खाद्यपदार्थांची विक्री करून कुटुंबाचा अनेक वर्षांपासून उदरनिर्वाह करतो. मात्र, कोरोनामुळे व्यवसायावर संकट ओढवले होते. उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता व्यवसाय सुरू झाल्याने संसाराचा गाडाही सुरळीत होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने एस.टी.ची चाके थांबली होती. यामुळे आमच्या व्यवसायावरही गदा आली. या काळात प्रचंड आर्थिक ओढाताण झाली. अनलॉकनंतर आता व्यवसाय सुरळीत झाला आहे. 

एस.टी. महामंडळाला द्यावे लागते शुल्क- पुलगाव येथील बसस्थानकावर चार परवानाधारक विक्रेते आहेत. बसस्थानकाच्या प्रशासनाकडून चारही परवानाधारकांकडून मासिक भाडे घेतले जाते.- स्नॅक बारचे भाडे नऊ हजार ९५६, जनरल विक्री भाडे तीन हजार ३५१, परवानाधारक हॉकर्सकडून १२०० रुपये भाडे, तर खारे दाणे विक्री परवान्याचे ९५१ रुपये भाडे आहे.

 

टॅग्स :state transportएसटीbusinessव्यवसाय