शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

बसची कारला धडक; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 10:26 PM

वर्धा-नागपूर महामार्गावर वर्धेकडून नागपूरकडे जाणाऱ्या दिग्रस-नागपूर या एम. एच. १४ बी. टी. ४७६० क्रमांकाच्या बसने विरुद्ध दिशेने येणाºया एम. एच. २८ आर. ३२२२ क्रमांकाच्या कारला जबर धडक दिली. यात कार मधील चार जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवर्धा- नागपूर मार्गावरील घटना : महामार्गावरील आठवी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : वर्धा-नागपूर महामार्गावर वर्धेकडून नागपूरकडे जाणाऱ्या दिग्रस-नागपूर या एम. एच. १४ बी. टी. ४७६० क्रमांकाच्या बसने विरुद्ध दिशेने येणाºया एम. एच. २८ आर. ३२२२ क्रमांकाच्या कारला जबर धडक दिली. यात कार मधील चार जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्यावरच उभ्या राहिल्याने या परिसरातील वाहतूक खोळंबली होती.वर्धा-नागपूर महामार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. अशातच हा झालेला आठवा अपघात आहे. मागील सात अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी वळण रस्ते तयार करण्यात आले आहेत. अशातच भरधाव असलेल्या वाहनाच्या चालकाचे लक्ष थोडेजरी विचलीत झाल्यास वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटतो. त्यामुळे कंत्राटदारानेही सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी सूचना फलक लवण्याची गरज आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली असून वृत्तलिहिस्तोवर जखमींची नावे कळ शकली नाही.

टॅग्स :Accidentअपघात