शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

नियोजित दिवशीच केंद्रावर कापूस आणावा

By admin | Updated: January 28, 2015 23:39 IST

भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) तर्फे आधारभूत किमतीने जिल्ह्यातील आठ केंद्रावर कापसाची खरेदी करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी कापूस खरेदीचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत.

वर्धा : भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) तर्फे आधारभूत किमतीने जिल्ह्यातील आठ केंद्रावर कापसाची खरेदी करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी कापूस खरेदीचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी निश्चित केलेल्या दिवशीच केंद्रावर कापूस खरेदीसाठी आणावा, अशी माहिती जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले आहे.कापूस खरेदी केंद्राच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनसामग्री नुसार त्या त्या केंद्रावर किती जास्त कापूस खरेदी होईल यासंदर्भात मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच खरेदीचे दिवस निश्चित करण्यात आलेले आहेत. शेतकरी बांधवांनी कापूस केंद्रात माल विक्री आणण्यापूर्वी केंद्रावरील निश्चित केलेल्या दिवशीच कापूस खरेदीसाठी आणावा अस सीसीआयतर्फे सांगण्यात आले आहे.जिल्ह्यात हिंगणघाट केंद्रावर १० हजार क्विंटल दररोज कापूस खरेदी करण्यात येणार असून सोमवार, मंगळवार, गुरूवार व शुक्रवार याच दिवशी कापूस खरेदी करण्यात येईल. वर्धा केंद्रावर दीड हजार क्विंटल दररोज कापूस खरेदीची क्षमता असून सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशीच कापूस खरेदी करण्यात येईल. तसेच देवळी केंद्रावर दररोज ३ हजार ५०० क्विंटल सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. पुलगाव केंद्रावर दररोज १ हजार ५०० क्विंटल सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. कांढळी केंद्रावर दररोज १ हजार ५०० क्विंटल सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. सिंदी (रेल्वे) केंद्रावर दररोज १ हजार क्विंटल दररोज गुरूवार, शुक्रवार, शनिवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. रोहणा केंद्रावर दररोज १ हजार ५०० क्विंटल दररोज सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. वडनेर केंद्रावर १ हजार ५०० क्विंटल दररोज कापूस सोमवार, बुधवार, आणि शनिवार रोजी खरेदी करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)