शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बिबट्याची अंधश्रद्धेतून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अटकेत असलेल्या आरोपींना सोबत घेऊन घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. इतकेच नव्हे तर आरोपींनी गुन्हा कशा पद्धतीने केला याची माहितीही जाणून घेतली. शुक्रवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गोविंद केकापूरे, प्रवीण बुरघाटे, मंगल मानकर, महेश आमझरे, राहूल कासार, रमेश कासार, नरेंद्र कासार या आरोपींना अटक करून त्यांची १५ डिसेंबरपर्यंत वनकोठडी मिळविली आहे.

ठळक मुद्देएका पायाचा शोध सुरू । आरोपींची संख्या पोहोचली अकरावर

वर्धा : मांडवा शिवारात गुरूवारी सुमारे अडीच वर्षीय बिबट्याचा मृतदेह पाय व मुंडके नसलेल्या अवस्थेत आढळून आला. या बिबट्याची शिकार अघोरी शक्ती प्राप्त करण्यासाठी करण्यात आल्याचे वनविभागाच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून मृत बिबट्याचे तीन पाय आणि मुंडके जप्त करण्यात आले आहे;पण बिबट्याचा चौथा पायाचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत. शुक्रवारी सात आरोपींना अटक करून त्यांची १५ डिसेंबरपर्यंत वनकोठडी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळविली आहे. तर शनिवारी आणखी चार आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्याने सध्या आरोपींची संख्या अकरावर पोहोचली आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अटकेत असलेल्या आरोपींना सोबत घेऊन घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. इतकेच नव्हे तर आरोपींनी गुन्हा कशा पद्धतीने केला याची माहितीही जाणून घेतली. शुक्रवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गोविंद केकापूरे, प्रवीण बुरघाटे, मंगल मानकर, महेश आमझरे, राहूल कासार, रमेश कासार, नरेंद्र कासार या आरोपींना अटक करून त्यांची १५ डिसेंबरपर्यंत वनकोठडी मिळविली आहे. तर शनिवारी अशोक चाफले, आनंदा चाफले, आनंदा रावेकर तर राजू कुभेंबार यांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने अघोरी शक्तीच्या प्राप्तीसाठी संगणमत करून बिबट्याची शिकार केली, शिवाय पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बिबट्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न केल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. शनिवारी अटकेतील आरोपींना सोबत घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रसंगी सहाय्यक उपवनसंरक्षक तुषार डमढेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, क्षेत्र सहाय्यक उमेश शिरपुरकर, श्याम परडके, रवी राऊत, जाकीर शेख, विनोद सोनवणे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :leopardबिबट्या