अंध दाम्पत्य बेमुदत उपोषणावर

By Admin | Updated: April 30, 2016 02:25 IST2016-04-30T02:25:30+5:302016-04-30T02:25:30+5:30

येथील नगर परिषदेच्या वेळकाढू धोरणाविरोधात मोहन व लता कुलकर्णी या अंध दाम्पत्याने शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

Blind couples on hunger strike | अंध दाम्पत्य बेमुदत उपोषणावर

अंध दाम्पत्य बेमुदत उपोषणावर

आरोप : नगर परिषद प्रशासनाची कार्यप्रणाली बेजबाबदार
आर्वी : येथील नगर परिषदेच्या वेळकाढू धोरणाविरोधात मोहन व लता कुलकर्णी या अंध दाम्पत्याने शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. शिवाजी चौक येथे उपोषणाला प्रारंभ करुन शासनाचा निषेध नोंदविला आहे.
सप्टेंबर २०१२ मध्ये आलेल्या पुरामध्ये दत्त वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या या दाम्पत्याचे घर वाहून गेले. मोहन कुलकर्णी यांनी शासनाला याविषयी पत्र लिहिले. सतत चार वर्ष पाठपुरावा केल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी २५ जानेवारी २०१६ मध्ये नगर परिषदेला ठराव मंजूर करून व प्लॉट सर्वे क्र. २१ पाणीची टाकी जवळ मौजा दौलतपुर येथे पालिकेच्या हद्दीत जागा उपलब्ध करून देण्याच्य सूचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. परंतु पालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कार्यप्रणालीमुळे त्यांना आजवर जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी याविरोधात आंदोलन सुरू केले आहे.(तालुका/शहर प्रतिनिधी)

Web Title: Blind couples on hunger strike