अस्वलाचा विहिरीत मृत्यू

By Admin | Updated: December 23, 2016 03:58 IST2016-12-23T03:58:59+5:302016-12-23T03:58:59+5:30

शेतातील विहिरीत पडून दोन पिलांसह मादी अस्वलाचा मृत्यू झाला. कारंजा शेतशिवारात बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.

Bear in the well of bear | अस्वलाचा विहिरीत मृत्यू

अस्वलाचा विहिरीत मृत्यू

कारंजा (घा.) (वर्धा) : शेतातील विहिरीत पडून दोन पिलांसह मादी अस्वलाचा मृत्यू झाला. कारंजा शेतशिवारात बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. पाण्याच्या शोधात हे अस्वल विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे येथील केशव भांगे यांना शेतात गेले असताना दुर्गंधी आली. पडक्या विहिरीत मादी अस्वल व तिची दोन पिले मृतावस्थेत आढळली. याची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्या पाण्यात गाळ साचला होता. पोलिसांच्या मदतीने या अस्वलांचा शोध घेण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Bear in the well of bear