शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! ‘स्वाईन फ्ल्यू’ देतोय धडक

By admin | Updated: September 10, 2015 02:32 IST

सबंध देशातील नागरिकांना काही वर्षांपासून आरोग्याच्या दृष्टीने त्रस्त करणारा ‘स्वाईन फ्ल्यू’ या आजाराने जिल्ह्यात पुन्हा धडक दिली आहे.

सामान्य रुग्णालयात आढळला रुग्ण : नागरिकांनी खबरदारी घेणे झाले गरजेचेवर्धा : सबंध देशातील नागरिकांना काही वर्षांपासून आरोग्याच्या दृष्टीने त्रस्त करणारा ‘स्वाईन फ्ल्यू’ या आजाराने जिल्ह्यात पुन्हा धडक दिली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात एका चार वर्षीय बालक स्वाईन फ्ल्यूने ग्रस्त असल्याचे समोर आले होते. सदर बालकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. यासाठीच जिल्हा सामान्य रुग्णालयाकडूनही सावधगिरीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.शहरातील सानेगुरूजी नगर येथील एका चार वर्षीय बालकाला २ सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तपासणी करून ठशांचे नमूने पाठविले असता ४ सप्टेंबर रोजी स्वाईन फ्ल्यू पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. अहवाल प्राप्त होताच रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्याच्यावर त्या दिशेने उपचार करण्यात आले. यामुळे बालकाच्या प्रकृतीत लगेचच सुधारणा झाली. जिल्ह्यातील अन्य कुठल्याही रुग्णालय वा खासगी दवाखान्यांमध्ये स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळून आल्याची नोंद नाही. स्वाईन फ्ल्यू पॉझिटीव्ह आढळलेला सदर बालक आपल्या पालकांसोबत नाशिक येथील कुंभमेळ्यामध्ये गेला होता, अशी माहितीही देण्यात आली आहे. नाशिक येथून परतल्यानंतरच सदर बालकाला सर्दी, खोकला व ताप जाणवत होता. यामुळे त्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीमध्ये स्वाईन फ्ल्यू पॉझिटीव्ह आढळून आला होता. योग्य आणि वेळीच उपचार मिळाल्यामुळे सदर बालकाची प्रकृती सुधारली.वास्तविक, ऋतू बदलाच्या कालावधीमध्ये असणारे वातावरण स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूला पोषक असते; पण सप्टेंबर महिन्यातच स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळला. सध्या पावसाळा सुरू असून डेंग्यू या आजाराकरिता हे वातावरण पोषक असते. गतवर्षी डेंग्यूचा मोठा प्रकोप होता; पण जनजागृतीनंतर यावर्षी डेंग्यूचे रुग्ण आढळून येत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाद्वारे सांगण्यात आले. स्वाईन फ्ल्यू च्या विषाणूसाठी हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतूमधील कालावधी पोषक मानला जातो. याच काळात स्वाईन फ्ल्यूचे विषाणू पसरतात. असे असले तरी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने खबरदारी म्हणून काही उपाययोजना करण्यात येत आहे. शिवाय खासगी रुग्णालये, दवाखाने यांच्याकडूनही दररोज आजार आणि रुग्णांची माहिती घेतली जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)स्वाईन फ्ल्यू हा हवेमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. मार्च २००९ मध्ये मेक्सिको देशात या आजाराची प्रथम बाधा झाल्याची नोंद आहे. यानंतर या आजाराने सर्वत्र नागरिकांना जेरीस आणले. वर्धा जिल्ह्यातही गतवर्षी अनेक रुग्ण आढळून आले होते. स्वाईन फ्ल्यू हा आजार एन्फ्लूएन्झा ए (एच वन, एन वन) या विषाणूमुळे होतो. या आजाराची लक्षणे साधारण तापाप्रमाणेच असतात. यामुळे सुरूवातीला आजाराचे योग्य निदान होत नाही. या आजाराची लागण झाल्यास सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि क्वचित प्रसंगी उलट्या, जुला ही सर्वसाधारण लक्षणे आढळतात.या आजाराचा प्रसार हवेतून होतो. स्वाईन फ्ल्यू बाधित रुग्णांच्या शिंक आणि खोकल्यातून हे विषाणून हवेद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात.