शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकघरातून तांब्याची भांडी नामशेष

By admin | Updated: October 14, 2015 02:09 IST

आगरगाव: पूर्वी घरोघरी जेवणात तसेच अन्न शिजविण्यासाठी तांब्याची भांडी मोठ्या संख्येने वापरात होती.

आरोग्यावर परिणाम : विद्युत वाहक असल्याने किमतीत वाढआगरगाव: पूर्वी घरोघरी जेवणात तसेच अन्न शिजविण्यासाठी तांब्याची भांडी मोठ्या संख्येने वापरात होती. त्याचा औषधी गुणधर्मही लोकांना ठाऊक होता. मात्र बदल्या जीवनशैलीचा परिणाम तांब्यांच्या भांड्यांवरही पडला आहे. परिणामी प्राचीन काळापासून वापरात असलेली ही भांडी आज अनेक घरांमधून कालबाह्य झाल्याचे दिसते. या तांब्यांच्या भाड्याांची जागा आता स्टेनलेस स्टील व फायबरच्या भाड्यांनी घेतली आहे. आरोग्य सुदृढ रहावे यासाठी पूर्वीच्या काळी तांब्याची भांडी वापरली जात असत. मात्र कालौघात ही भांडी दुर्मिळ झाल्याचे चित्र आहे. नव्या पिढीकडून रेडिओ, टीव्ही, जुन्या लाकडी खुर्च्यासह अन्य जुन्या काळातील वस्तूंचा वापर होत नसल्याचे दिसते. यातच तांब्याची भांडीदेखील हद्दपार करून आता फायबर व स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर सर्रास सुरू झाला आहे. सध्याच्या काळात केवळ गरजेपुरताच तांब्याच्या भांड्यांचा वापर होताना दिसतो. धार्मिक कार्यात आजही आवर्जून तांब्याची भांडी वापरली जातात. तांबा या धातूंचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. तांबा वाहक असल्यामुळे विद्युत पुरवठ्यासाठी या तारांचा उपयोग केला जातो. रबरची कोटींग असलेल्या तांब्याच्या तारांचा उपयोग वायर म्हणून घरातील वीज जोडणीसाठी केला जातो. तांबे हा धातू बहुगुणी असून आरोग्यासाठी अतिशय उत्तम असल्याचा उल्लेख आयुर्वेदात आढळतो. तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ते सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने अनेक आजार नाहिसे होतात, असे तज्ज्ञ सांगतात. स्टीलच्या भांड्यांपेक्षा तांब्याच्या भांड्यांचा वापर अधिक होत असलेले स्वयंपाकघर आता दुर्मिळच झाल्याचे चित्र आहे. तांबे हे खाद्यपदार्थातील विषाणूंचा नायनाट करते, असे सांगतात. मात्र ग्रामीण भागासह शहरातूनही तांब्याची भांडे हद्दपार होत असल्याचे दिसून येते.(वार्ताहर)