शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

केळी उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

वर्धा जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातूनही केळीची मोठ्या प्रमाणावर आवक होते. यंदा केळीच्या हंगामाला कोरोना विषाणूसोबतच व्यापाºयांच्या लुटीच्या धोरणाचा फटका बसला. पवनार येथील प्रयोगशील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तब्बल २० एकरात केळी पिकाची फेब्रुवारी-मार्चदरम्यान लागवड केली. मार्च महिन्यात दोनवेळा या पिकाला अवकाळी पावसाने तडाखा दिला.

ठळक मुद्देकोरोना केवळ निमित्तमात्र! : केळी झाली कडवट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या नावाखाली जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाºयांनी अक्षरश: लूट चालविली आहे. याचाच परिणाम उत्पादकांसाठी केळीचा गोडवा हरविला असून ग्राहकांनाही ती चढ्या दरात खरेदी करावी लागत असल्याचे चित्र आहे.सेलू तालुका केळीचा कॅलिफोर्निया म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळखला जातो. एकट्या सेलू तालुक्यात केळी पिकाच्या भरवशावरच कोटींची उलाढाल होते. पवनारात ३० वर्षांपूर्वी केळीचे मोठे उत्पादन घेतले जायचे. तीस ते चाळीस ट्रक केळी येथून राज्यात जायची मात्र, हे चित्र कालांतराने बदलले.वर्धा जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातूनही केळीची मोठ्या प्रमाणावर आवक होते. यंदा केळीच्या हंगामाला कोरोना विषाणूसोबतच व्यापाºयांच्या लुटीच्या धोरणाचा फटका बसला. पवनार येथील प्रयोगशील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तब्बल २० एकरात केळी पिकाची फेब्रुवारी-मार्चदरम्यान लागवड केली. मार्च महिन्यात दोनवेळा या पिकाला अवकाळी पावसाने तडाखा दिला. या नैसर्गिक संकटातून सावरत वाघमारे यांनी पिकाची उत्तमरीत्या निगा राखल्याने पीक जोमात बहरले. केळीच्या घडांनी झाडे अक्षरश: लदबदली. केळी लागवडीकरिता त्यांना २० लाख रुपये इतका लागवड खर्च आला. केळीचे ६० लाख इतके उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, केळीला सद्यस्थितीत असलेल्या मातीमोल भावामुळे त्यांच्या या आशेवर पाणी फेरल्या गेले. वाघमारे यांच्या शेतातील केळी पीक सध्या कापणीला आले आहे. बाजारपेठेत केळीला ३ रुपये किलो इतका कवडीमोल भाव दिला जात आहे.उत्पादकांकडून तीन रुपये दराने खरेदीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असले तरी रस्त्याच्या कडेला ६० रुपये डझनने केळी विकणारा किरकोळ विक्रेता एका दिवसात प्रतिकिलो केळीमागे १२.५० रुपये कमावतो. कोल्ड स्टोअरेज आणि रायपनिंग चेंबरवाला व्यापारी व्यापारी पाच दिवसांआड ८ रुपये कमवित आहे. मात्र, वर्षभर काळ्या मातीत राब-राब राबूनही प्रतिकिलो उत्पादन खर्च करणाºया शेतकºयांना मात्र, उत्पादन खर्च पदरात न पडता केवळ तीन रुपये इतका मातीमोल भाव मिळत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती