शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चिनी नायलॉन मांजाविक्रेत्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

रोहित नामदेव सुपारे (२२) रा. घोराड (सेलू) ह. मु. रानडे प्लॉट, रामनगर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पतंग उडविण्याकरिता पूर्वीप्रमाणे सुती धागा अथवा तयार केलेल्या मांजाचा वापर केला जात नसून चिनी नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. बाजारपेठेतही याच नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरू आहे.

ठळक मुद्देघोराडच्या युवकास अटक : रामनगर पोलीस, वनविभागाच्या फिरते पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात पतंगबाजीला उधाण आले असून बंदी घालण्यात आलेल्या चिनी नायलॉन मांजाची बाजारपेठेत खुलेआम विक्री सुरू आहे. याबाबत लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर रामनगर पोलीस आणि वर्धा विनविभागाच्या फिरते पथकाने रामनगरात कारवाई करून मांजा जप्त करीत युवकास अटक केली.रोहित नामदेव सुपारे (२२) रा. घोराड (सेलू) ह. मु. रानडे प्लॉट, रामनगर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पतंग उडविण्याकरिता पूर्वीप्रमाणे सुती धागा अथवा तयार केलेल्या मांजाचा वापर केला जात नसून चिनी नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. बाजारपेठेतही याच नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरू आहे.पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे आशीष गोस्वामी यांनी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल करून मांजाची रानडे प्लॉट, रामनगर येथे किरायाच्या घरातून विक्री होत असल्याची माहिती दिली. त्यावरून रामनगर पोलीस आणि वनविभागाच्या फिरते पथकाने रानडे प्लॉटमधील गिरीपुंजे यांच्या मालकीच्या घरी किरायाने घेतलेल्या घरी छापा घालून ५ हजार ५०० रुपये किमतीच्या नायलॉन मांजाच्या नऊ चक्री जप्त केल्या. या प्रकरणार रोहित सुपारे याला अटक करण्यात आली. त्याच्यावर पर्यावरण सुरक्षा अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई रामनगरचे ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात एसएसआय विनोद राऊत, अझरुद्दिन काझी, राहुल दूधकोहळे, वनविभागाच्या फिरते पथकाचे वसंत खेलकर, वनरक्षक नीलेश राऊत, रूपेश कारोडकर यांनी केली.पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे एसपींना निवेदनपीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे सचिव आशिष गोस्वामी, कौस्तुब गावंडे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांना निवेदन सादर करीत जीवघेण्या चिनी नायलॉन मांजावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. लोकमतने पाठपुरावा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.होलसेल स्वरूपाचा होता व्यवसायरोहित सुपारे हा मूळचा सेलू तालुक्यातील घोराड येथील रहिवासी असून रामनगरातील रानडे प्लॉटमध्ये भाडे तत्त्वावरील खोलीर राहून नायलॉन मांजा विक्रीचा अवैधरीत्या व्यवसाय करीत होता. त्याचा हा व्यवसाय होलसेल स्वरूपाचा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिस