शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

बी अलर्ट, एसपी येतील !

By admin | Updated: June 2, 2014 01:37 IST

जिल्हा पोलीस आपल्या कर्तव्याबाबत दक्ष आहेत अथवा त्यांच्या

अल्लीपूर : जिल्हा पोलीस आपल्या कर्तव्याबाबत दक्ष आहेत अथवा त्यांच्या कामात कसूर करतात, हे पाहण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रात्री-अपरात्री केव्हाही कोणत्याही पोलीस ठाण्याला भेट देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. यात त्यांनी नुकतीच अल्लीपूर पोलीस ठाण्याला रात्री १२ वाजता भेट दिली. यावेळी कर्तव्यात हयगय करणार्‍या दोन कर्मचार्‍यांना दंड करण्यात आला आहे. यामुळे ‘बी अलर्ट, एसपी येतील’ असे म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

पोलिसांच्या नॉन अलर्ट प्रवृत्तीमुळे चोरटे सक्रिय झाले आहेत. आता त्यांच्यावर आळा घालण्याकरिता पोलीस अधीक्षक अलर्ट झाल्याने ठाण्यात नाईट ड्युटी करणार्‍या कर्मचार्‍यांवर ‘जागते रहो’ची वेळ आली आहे. जिल्ह्याचा पदभार स्वीकरल्यानंतर काही काळात शांत असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी त्यांच्या कामाला आता प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. रात्री कोणत्या वेळी कोणत्या ठाण्यात त्यांची भेट होईल याचा नेम राहिला नाही. यात त्यांनी नुकतीच रात्री १२ वाजता अल्लीपूर पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी ठाण्यात असलेले जमादार विजय कडू व शिपाई पवन गव्हाळे यांच्या कर्तव्यात कसूर असल्याचे आढळून आले. त्यांना समज देण्याकरिता जिल्हा अधीक्षक कार्यालयात दुसर्‍या दिवशी हजर राहण्याच्या सूचना देत जिल्हा पोलीस अधीक्षक पुढच्या कार्याला रवाना झाले.

हे दोन्ही पोलीस कर्मचारी एसपी कार्यालयात हजर झाल्यावर त्यांना विचारणा करण्यात आल्यावर ते योग्य उत्तर देण्यात असक्षम ठरले. यावरून या दोन्ही कर्मचार्‍यांना हजार रुपये दंड देत पुन्हा असा प्रकार निदर्शनास आल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे बजावण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या कारवाई मुळे पोलीस विभागात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. रात्र पाळीत कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांनी तर या कारवाईमुळे धसकाच घेतला आहे. सदर कर्मचारी त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांना आता जागते रहो साहेब येताहेत असे म्हणत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण होऊ लागले आहे. (वार्ताहर)