शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मृत भावाला अविवाहित दाखवत वहिनीला संपत्तीतून बेदखल करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 15:30 IST

Wardha : घरात तोडफोड करून मालमत्तेवर दावा करणाऱ्या आरोपींना वर्धा पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा न्यायालयाची दिशाभूल, खोटी माहिती व कागदपत्रे सादर करण्यासह निवासस्थानाची तोडफोड करीत विधवा महिलेची मालमत्ता हडपू पाहणाऱ्या नागपूरच्या दाम्पत्यावर अखेर वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

माधुरी रवींद्र भोसकर व रवींद्र भोसकर (दोन्ही रा. नागपूर) असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. प्रगती नीलेश खाडे (३५ रा. मालगुजारीपुरा) यांनी हतबल झाल्यावर या प्रकरणी पोलिस अधीक्षकांना तक्रार दिल्यानंतर त्याच दिवशी कारवाई करण्यात आली. महत्त्वाचे असे की, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांनी प्रत्यक्ष महिलेचे निवासस्थान गाठून घडलेला प्रकार जाणून घेतला. संबंधित प्रकरणी न्याय मिळावा म्हणून प्रगती पोलिस ठाण्यात गेल्या. मात्र, तक्रार घेण्यात आली नाही. अखेर त्यांनी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांची भेट घेत तक्रार दिली. तक्रारीची तत्काळ दखल घेत पोलिस अधीक्षकांनी तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानंतर अपर पोलिस अधीक्षकांनी प्रगतीच्या निवासस्थानी जाऊन माहिती जाणून घेतली. काही वेळातच शहर पोलिस ठाण्यात माधुरी रवींद्र भोसकर व रवींद्र भोसकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी माधुरी रवींद्र भोसकर यांनी मरण पावलेला माझा भाऊ अविवाहित होता. त्यामुळे मीच माझे वडील दिवंगत त्र्यंबक खाडे यांच्या मालमत्तेची एकमेव वारस उरल्याचे कागदपत्रे सादर करीत वारसा प्रमाणपत्र मिळविले.

अशी घडली घटना...प्रगती गोमासे यांचे २१ मार्च २०१८ ला नीलेश त्र्यंबक खाडे यांच्याशी दुसरे लग्न झाले. या दाम्पत्यास एक मुलगी झाली. प्रगती यांच्या सासू शोभा खाडे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. नंतर त्यांच्या पतीचे २०२१ ला निधन झाले. २०२२ मध्ये सासऱ्यांचेही निधन झाले. त्या पहिल्या व दुसऱ्या लग्नापासून झालेल्या प्रत्येकी एक, अशा दोन मुलींसह सासऱ्यांच्या मालकीच्याच घरी राहू लागल्या. त्यांनी घरासमोरच पाणीपुरीचे दुकान लावले. प्रगतीच्या सासऱ्यांनी मृत्युपत्र करून येथील राहते घर, मजरा (कासारखेडा) येथील १७ एकर शेती त्यांच्या नावाने करून दिली. बँकेतील खात्याची वारसदार म्हणूनही त्यांचेच नाव नोंदविले. प्रगती मक्त्त्याने शेती देत होत्या. मात्र, सासरे मरण पावल्यानंतर नणंद माधुरी रवींद्र भोसकर व त्यांचे पती रवींद्र भोसकर यांनी शेती ताब्यात घेतली. राहत्या घरावर दावा केला. घराच्या दर्शनी भागातील ब्लॉक ताब्यात घेतला. घरात तोडफोड करून २० हजारांचे नुकसान केले, असे तक्रारीत म्हटले आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा