शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

गॅस एजन्सीच्या अनागोंदीमुळे ग्राहकांत संतापाचे वातावरण

By admin | Updated: October 18, 2015 02:26 IST

स्थानिक आर इण्डेन गॅस एजन्सीच्या सदोष व्यवस्थेमुळे देवळी व परिसरातील ग्राहक चांगलेच वैतागले आहेत.

ग्राहकांची कोंडी : आठ ते दहा दिवस सिलिंडर मिळेनादेवळी : स्थानिक आर इण्डेन गॅस एजन्सीच्या सदोष व्यवस्थेमुळे देवळी व परिसरातील ग्राहक चांगलेच वैतागले आहेत. आॅनलाईन बुकिंग केल्यानंतर सुद्धा आठ ते १० दिवसपर्यंत सिलिंडर मिळत नाही. एजन्सीच्यावतीने घरपोच सेवा पुरविली जात नसल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. याबाबत गॅस एजन्सीच्या वरिष्ठांना तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.देवळी व परिसरात आर. इण्डेन हिच एकमेव गॅस एजन्सी कार्यरत असून त्यांच्याकडे शेकडो ग्रहकांचा अधिभार आहे. गॅस सिलिंडरची गाडी वेळोवेळी येत नसल्यामुळे तसेच एजन्सीची यंत्रणा कुचकामी ठरत असल्यामुळे मन:स्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एजन्सीसमोर दररोज ग्राहकांचा लोंढा बघावयास मिळतो. सणासुदीच्या दिवसात हा प्रकार नित्याचाच झाला आहे. ग्राहकांनी पावती फाडल्यानंतर ही पावती व गॅसपुस्तिका कार्यालयात देवून चार-पाच दिवसांनी ग्राहकांना बोलाविले जाते. या तारखेला ग्राहक गेल्यानंतर त्याला काही अडचणी सांगून पुन्हा तारखेला बोलाविले जाते. यादरम्यान एजन्सीकडे असलेली ग्राहकांची गॅसपुस्तिका व पावती गहाळ झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. गॅसच्या कार्यालयातून सिलिंडर न मिळता गोदामातून ते दिल्या जात आहे. ग्रामीण भागातील गरीब ग्राहकांना वेळोवेळी कार्यालयात हेलपाटा मारणे शक्य नसल्यामुळे घरपोच सेवा देण्यात यावी. गॅसच्या स्टॉकची माहिती मोबाईल एसएमएसचे माध्यमातून देण्यात यावी.यामध्ये गॅस एजन्सीची कुचराई खपवून न घेता आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असा ईशारा ग्राहकांनी निवदेनातून दिला आहे. यावेळी राजू भुंबुर, प्रवीण फटींग, रामभाऊ तायडे, विकास राऊत, अविनाश पुसदकर, ज्ञानेश्वर पांडे, किरण देशमुख, मदन पाटील यांची उपस्थिही होती. (प्रतिनिधी)