शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे अडविल्याने आर्वीत तणाव

By admin | Updated: December 18, 2014 02:02 IST

येथून देऊरवाडा मार्गाने अमरावतीकडे काही मंडळी बैलाचा कळप घेऊन जात होती. बैल कत्तलखान्याकडे नेत असावे, असा संशय घेत तो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अडविला.

आर्वी : येथून देऊरवाडा मार्गाने अमरावतीकडे काही मंडळी बैलाचा कळप घेऊन जात होती. बैल कत्तलखान्याकडे नेत असावे, असा संशय घेत तो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अडविला. यावरून दोन्ही गटात हाणामारी झाली. पोलीसही घटनास्थळी धावून गेले. ते साध्या वेशात असल्याने त्यांनाही धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. यात बजरंग दलाचे पाच कार्यकर्ते जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने बुधवारी आर्वीत काही काळ तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ३४ जणांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०४, २९४ व ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले़ यातील ९ जणांना अटक केली असून २५ जणांचा शोध सुरू आहे़तणावाची स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शहरात सुमारे १०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. तसेच काही ठिकाणी नाकाबंदीदेखील करण्यात आली. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी बुधवारी आर्वी गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राप्त माहितीनुसार, आर्वी-देऊरवाडा मार्गावर जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि कार्यकर्ते घटनास्थळी रवाना झाले. तेथे उपस्थित असलेल्या १८ ते २० जणांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या बजरंग दलाच्या पाच कार्यकर्त्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार शैलेश साळवी यांच्यासह साध्या वेशातील पोलीस घटनास्थळी रवाना झाले; पण पोलिसांनाही धक्काबुक्की झाली. पोलीस असल्याचे कळताच मारहाण करणारे घटनास्थळावरून पळून गेले. घटनेत वापरलेल्या लाठ्याकाठ्या पोलिसांनी जप्त केल्या. दरम्यान, अनुप जैस्वाल व बजरंग दल गौरक्षण व हिंदू परिषदेच्या ५० वर कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची भेट घेत आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली़(तालुका प्रतिनिधी)