अ‍ॅपे-दुचाकीचा अपघात; तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:00 AM2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:16+5:30

सेलडोहकडून एम.एच. ३२ बी. ८३६७ क्रमांकाचा अ‍ॅपे प्रवासी घेऊन केळझरकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम.एच. ३२ ए.एफ. ३१२५ या दुचाकीची धडक झाली. यात दुचाकी वरील प्रशांत मसराम (४५), रवी शेटे (४०) व प्रशांत आंबटकर (३५) रा. सिंदी (रेल्वे.) हे गंभीर जखमी झाले. अपघात होताच नागरिकांनी जखमींना सेवाग्राम रुग्णालयात हलविले

Appe-bike accident; Three serious | अ‍ॅपे-दुचाकीचा अपघात; तिघे गंभीर

अ‍ॅपे-दुचाकीचा अपघात; तिघे गंभीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : प्रवासी घेऊन जाणारा अ‍ॅपे आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली. यात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. सदर घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास खडकीच्या हनुमान मंदिराजवळ घडली.
सेलडोहकडून एम.एच. ३२ बी. ८३६७ क्रमांकाचा अ‍ॅपे प्रवासी घेऊन केळझरकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम.एच. ३२ ए.एफ. ३१२५ या दुचाकीची धडक झाली. यात दुचाकी वरील प्रशांत मसराम (४५), रवी शेटे (४०) व प्रशांत आंबटकर (३५) रा. सिंदी (रेल्वे.) हे गंभीर जखमी झाले. अपघात होताच नागरिकांनी जखमींना सेवाग्राम रुग्णालयात हलविले. यातील प्रशांत मसराम याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. अपघात होताच ऑटोचालक गणेश सोनटक्के रा. सुकळी (स्टे.) हा घटनास्थळावरून पसार झाला. या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. या घटनेची नोंद सिंदी रेल्वे पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

भरधाव कार उलटली
खडकी-सेलडोहच्या मधोमध भरधाव असलेली कार अनियंत्रित होत उलटली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. सदर अपघाताची माहिती मिळताच सिदी रेल्वे पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद सिंदी रेल्वे पोलिसांनी घेतली असून या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Appe-bike accident; Three serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात