शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अन्नपूर्णा माय घर धान्यानं भरू दे...

By admin | Updated: October 14, 2014 23:23 IST

आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला जिल्ह्यासह विदर्भात आठवीची पूजा केली जाते. कागदावर काढलेल्या हत्तीची या काळात येत असलेल्या फळांनी पूजा केली जाते. ज्वारीच्या कणसाचा मांडव

पराग मगर - वर्धाआश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला जिल्ह्यासह विदर्भात आठवीची पूजा केली जाते. कागदावर काढलेल्या हत्तीची या काळात येत असलेल्या फळांनी पूजा केली जाते. ज्वारीच्या कणसाचा मांडव टाकला जातो. मातीच्या मडक्याचीही पूजा केली जाते. बाजारात सर्वत्र आठवीच्या पूजेचे साहित्य विकण्यास आले असून खरेदीची लगबग सुरू झाली आहे. निसर्गपूजक असलेल्या भारतीय समाजात आठवीची पूजा ही ढोवळमानाने धान्याची पूजा म्हणून केली जात असली तरी त्याचे सामाजिक व ऐतिहासिक संदर्भ काय याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे दिसते. भारतीय समाज हा मुळात निसर्गपूजक आहे. त्या त्या काळात येत असलेल्या धान्याची पूजा करण्याची प्रथा सर्वत्र आढळते. आठवीची पूजा ही त्याचेच द्योतक आहे. आता जरी सर्वत्र गव्हाचे प्रचलन असले तरी पूर्वी जिल्ह्यात बहुतेक भागात ज्वारी मुख्य पीक होते. भाकरी हेच मुख्य खाद्य होते. त्यामुळे ज्वारीला अन्नपूर्णाही संबोधल्या जाते. याच काळात ज्वारीची कणसं भरतात. त्यामुळे ते पीक घरी आणताना तिची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली असावी. याच ज्वारीची आंबिल करून तिचा देवाला नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. घर ज्वारीच्या भरल्या कणसाप्रमाणे भरून जावं यासाठी ही पूजा केली होत असे. पण कालांतराने या पूजेचे संदर्भ बदलले. गंगेच्या काठावर असलेल्या प्रांतामध्ये या दिवशी कुमारिका आपल्या ओंजळीत पाणी आणून देवीची पूजा करतात. त्यामुळे याला कराष्टमीही म्हणतात. त्याचप्रमाणे काही भागात या सणाला लेकुरवाळीची पूजा असेही म्हणतात. घरी या दिवशी कुळाचार असतो. आठ फळे ठेवून पूजा केल्यानेही याला काही भागात आठवीची पूजा म्हणतात. असे असले तरी या सणाचे ऐतिहासिक व सामाजिक संदर्भ काळाच्या ओघात धुसर झाले आहे. केवळ कुळाचार म्हणून पूजा केली जाते. खरीपातले पहिले धान्य असलेल्या ज्वारीच्या आंबिलीला विशेष मान होता. पण आता ज्वारीच पेरल्या जात नसल्याने प्रथा म्हणून दुकानातून ज्वारी आणून त्याची आंबिल केल्या जात असल्याचे दिसते.