शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् त्यांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू

By admin | Updated: November 2, 2016 00:36 IST

दिवाळी प्रकाशाचा सण. या सणाला प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करतो; मात्र काहींवर या दिवशीही दोन वेळच्या जेवणाकरिता झुंज देण्याची वेळ येते.

सेवा फाऊंडेशनचा उपक्रम : ऐन दिवाळीच्या दिवशी मिळाली रस्त्यावर जगणाऱ्यांना भेट वर्धा : दिवाळी प्रकाशाचा सण. या सणाला प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करतो; मात्र काहींवर या दिवशीही दोन वेळच्या जेवणाकरिता झुंज देण्याची वेळ येते. अशाच कुटुंबांना त्यांच्या विचारात नसताना अचानक एखादी भेट मिळाल्यास त्यांचा आनंद गगणात मावणारा नसतो. असाच काहीसा आनंद वर्धेतील सेवा फाऊंडेशनच्या कार्याने शहरालगत असलेल्या हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबांना झाला. आकस्मिक मिळालेल्या या भेटीमुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूच तरळले. स्थानिक सेवा फाऊंडेशन व स्वामी मुक्तानंद योगाध्यात्मक केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिशय दुर्बल घटकांच्या जीवनात काही क्षण का होईना, दिवाळीच्या आनंदाचा अनुभव दिला. समाजामध्ये विविध स्तरातील लोक आपापल्या पद्धतीने दिवाळीचा सण साजरा करीत असताना आपल्या परिसरात असे अनेक नागरिक आहेत, ज्यांना दोन वेळच्या जेवणाचीही सोय नाही. अशा वंचित समाज बांधवाविषयी आपले काही उत्तरदायीत्व आहे, या उदात्त भावनेने काही व्यक्ती सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून एकत्र आल्या. त्यांनी वेगवेगळ्या गावातील १०१ कुटुंबांना दिवाळीसाठी रवा, साखर, तेल, डालडा, चना डाळ, मैदा, चिवडा, लाडू, खोबरा तेल, नवीन कपडे, आंघोळ व कपड्याचे साबण अशा जीवनावश्यक साहित्याचे बॉक्स तयार केले. ते बॉक्स मांडवा, पाचोड, कृष्णापूर, खैरी, गौरखेडा, सालदरा, सालोड (हि.), पिपरी (हनुमान गड), कारला आदी दुर्गम भागात राहणाऱ्या कुटुंबांना प्रत्यक्ष जात दिले. यात विशेषत: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा समावेश असल्याचे फाऊंडेशनच्यावतीने कळविण्यात आले आहे. अचानक व कुठलीही कल्पना नसताना अनपेक्षित मिळालेल्या मदतीमुळे या कुटुंबांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. यावेळी अनेकांनी आपल्या जीवनातील दु:ख सेवा फाऊंडेशनच्या सदस्यांकडे व्यक्त करीत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. समाजात असेही वंचित घटक असून आपण आजपर्यंत त्यापासून अनभिज्ञ होतो, त्यांच्याविषयी आपली काही कर्तव्य भावना आहे, अशी जाणीव फाऊंडेशनच्या सदस्यांना झाली.या उपक्रमास समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी साहित्य आणि रोख स्वरूपात मदत केली. या कार्याच्या यशस्वीतेकरिता सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद आगळेकर, उपाध्यक्ष ओंकार धावडे, सचिव अनंत बोबडे, कोषाध्यक्ष संजय इंगळे, सदस्य यशवंत कडू, सुधीर वैतागे, राजू ठक, चंद्रशेखर धुळे, गणेश अतकर, विजय बाभुळकर, रामेश्वर लांडे, महेश गाडगे, प्रवीण चौधरी, हरिभाऊ देशमुख, महेंद्र चिमणे, वैशाली ठाकरे, कविता सोरते, संदीप रघाटाटे, आशीष कुचेवार, भगवंत झाडे आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)