शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अन् मृतदेह श्वास घेऊ लागला!

By admin | Updated: October 11, 2016 02:24 IST

उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या खात्रीने कुटुंबीयांनी कापडात गुंडाळून पार्थिव घरी आणले. सर्व नातेवार्इंकांना

अंत्यसंस्काराची होती तयारी : वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जिवंत असल्याचा खुलासा देवकांत चिचाटे ल्ल पुलगाव उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या खात्रीने कुटुंबीयांनी कापडात गुंडाळून पार्थिव घरी आणले. सर्व नातेवार्इंकांना निधनाची वार्ताही देण्यात आली. तत्पूर्वी घरी अंत्यसंस्काराची तयारीही झालेली होती. मृतदेहावरील कापड काढताच तो मृतदेह श्वास घेत असल्याचे दिसले, अन् एकच खळबळ उडाली. मृतदेह श्वास घेत असल्याची वार्ता हवेसारखी शहरात पसरली. सोमवारी पुलगाव येथील गांधी चौक परिसरात घडलेली हा घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. दिनेश पारधेकर हे जिवंत असल्याची माहिती लगेच त्यांच्या कुटुंबीयांनी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल नारळवार यांना दिली. त्यांनी धाव घेऊन तपासणी करताच सदर इसम जिवंत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे दिनेश पारधेकर यांना उपचाराकरिता परत सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिनेश पारधेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री नातलगांना झाली. यावरून त्यांनी रुग्णालयातून सुटी घेत दिनेशचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या नातलग व परिचितांना दिली. तसेच सोमवारी सकाळी त्यांच्यावर मृतदेहावप अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळविण्यात आले. दिनेश यांचा मृत्यू झाला असे गृहीत धरून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह पुलगाव येथील गांधी चौक परिसरात असलेल्या निवासस्थानी आणला. सकाळी सर्व नातलग व परिसरात नागरिक गोळा झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना अचानक एका नातलगाने त्यांच्या अंगावरील कापड दबर सारताच दिनेशचा श्वास सुरू असल्याचे दिसून आले. मृतक श्वास घेत असल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. ‘मेलेला जिवंत झाला’ असे म्हणत परिसरातील नागरिकांनी दिनेश पारधेकर यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांच्या कुटुंबीयांनीही याची खात्री करण्याकरिता येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गोपाल नारळवार यांना लगेच बोलाविले. त्यांनी दिनेश पारधेकर यांचा मृत्यू झाला नाही तर ते अद्याप जिवंत असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या नाडीची गती ७२ असल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत त्यांना पर्याप्त मात्रेत आॅक्सिजन दिल्यास त्यांचे प्राण वाचणे शक्य असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. दिनेश जिवंत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी १०८ रुग्णवाहिच्या मदतीने त्यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचाराकरिता नेले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अंत्यसंस्काराकरिता नातेवाईक, मित्रपरिवार व शहरातील नागरिक जमा झाले होते. साऱ्यांच्या तोंडी मेलेला जिवंत झाला असे वाक्य होते. तसेच याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे दिसून आले. या घटनेची पुलगाव शहरातच नाही पंचक्रोशीत चांगलीच चर्चा होती.