शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

रक्कम जि.प.कडेच, ग्रा.पं.ची प्रतीक्षा मात्र कायमच

By admin | Updated: August 5, 2015 02:14 IST

ग्रामपंचायतींचा विकास साधण्याकरिता चौदाव्या वित्त आयोगातून रक्कम देण्यात येत आहे.

१४ वा वित्त आयोगाचे १२.१० कोटी जमा : कामांच्या मार्गदर्शक तत्त्वाअभावी महिनाभर तरी वितरण नाही रूपेश खैरी  वर्धाग्रामपंचायतींचा विकास साधण्याकरिता चौदाव्या वित्त आयोगातून रक्कम देण्यात येत आहे. याकरिता १२ कोटी १० लाख रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. मात्र कामाबाबत निर्देश नसल्याने ही रक्कम ग्रामपंचायतींना मिळण्याकरिता किमान महिनाभर तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. एप्रिल २०१५ पासून राज्यात चौदावा वित्त आयोग लागू झाला आहे. यातून आलेल्या निधीतून सन २०२० पर्यंत कामे करण्यात येणार आहे. मात्र यात कोणती काम करावयाची याचे निर्देश आले नसल्याने हा निधी जिल्हा परिषदेकडेच आहे. यामुळे त्यांचीही अडचण निर्माण होत असल्याचे दिसते. राज्य शासनाने निधी दिला आहे. त्याचा वापर करण्याचे कागदी अधिकार ग्रामपंचायतींना असले तरी त्याचा प्रत्यक्षात केव्हा वापर करता येईल या प्रतीक्षेत ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी आहेत. आलेला निधी वाटप करताना ९० टक्के लोकसंख्या व १० टक्के क्षेत्रफळ या नुसार निधी वितरीत करण्यात येणार आहे. हा निधी जिल्ह्यातील ५१७ ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे. यामुळे आलेला निधी बँक खात्यात जमा होण्याची साऱ्याच ग्रामपंचायतीना प्रतीक्षा आहे. हा निधी खर्च करताना सरपंच महत्त्वाचा ठरणार आहे. या आयोगाचा निधी खर्च करताना त्याला जि.प. सदस्यापेक्षा अधिक अधिकार राहणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीला या चौदाव्या वित्त आयोगातून वगळण्यात आले. यामुळे त्यांच्याकरिता अकरा ते चौदावा वित्त आयोगाचा प्रवास १०० टक्क्यातून शून्यावर आला आहे. त्यामुळे विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यातून नाराजीचा सूर निघत आहे.