शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन जॉन स्लेटने घेतला डवरे चालविण्याचा अनुभव

By admin | Updated: August 2, 2015 02:44 IST

अमेरिकन सरकारचे भारत, बांग्लादेश, श्रीलंका या देशांना अ‍ॅग्रिकल्चर सर्व्हिसेस देणारे कृषी क्षेत्राशी संलग्नित

पिकांचीही केली पाहणी : तंत्रज्ञान, बीजोत्पादन व डेअरी फार्मिंगसह शेती व्यवस्थानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वर्धा : अमेरिकन सरकारचे भारत, बांग्लादेश, श्रीलंका या देशांना अ‍ॅग्रिकल्चर सर्व्हिसेस देणारे कृषी क्षेत्राशी संलग्नित जॉन स्लेट व अमेरिकन अ‍ॅम्बेसीचे अ‍ॅग्रिकल्चर स्पेशालिस्ट भारतीय अमित आरध्य नवी दिल्ली यांनी कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे भेट दिली. याप्रसंगी जॉन स्लेट यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या शेतामध्ये डवरे चालविण्याचा अनुभव घेतला. यावेळी विविध पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विदर्भातील कापूस व सोयाबीन उत्पादक, हवामान, गत दोन-तीन वर्षांपासून पिकांवर हवामानाचा होणारा दुष्परिणाम, पीक परिस्थिती, किड व रोग व्यवस्थापन आदींबाबत जॉन स्लेट व अमित आरध्य यांनी डॉ. प्रदीप दवने यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय नागपूर येथील कृषी कार्यानुभव (रावेचे) विद्यार्थ्यांनीही जॉन स्लेट यांच्याशी कृषी विषयक समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. शिवाय शेतावर प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा घडवून आणली. याप्रसंगी नरेश ढोकणे, शेतकरी रमेश ढोकणे ईसापूर यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशी पिकांची पाहणी केली. यावेळी कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान, बिजोत्पादन व डेअरी फार्मिंगबाबत चर्चा शेतकरी, विद्यार्थी व शास्त्रज्ञांशी चर्चा केली. जॉन स्लेट व अमित आरध्य यानी यवतमाळ, अमरावती परिसरातील शेतकऱ्यांचीही भेट घेत मुंबईला प्रस्थान केले.(कार्यालय प्रतिनिधी)