आंबेडकरांना अभिप्रेत समाज परिवर्तन करण्यात कमी पडलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:36+5:30

पुलगाव येथील बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूल येथे पार पडलेल्या फेस्टीवलमध्ये ते बोलत होते. या फेस्टीवलचे उदघाटन समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर विजय मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन बागडे, चंद्रसेन डोंगरे, डॉ. सुभाष खंडारे, राजरत्न कुंभारे, भारत रंगारी, राजकुमार बेलसरे, किशोर येसनकार, देवानंद गायगवळी, सरपंच वनिता शिंगणापुरे, वहिदा शेख उपस्थित होते.

Ambedkar's intention was not to transform society | आंबेडकरांना अभिप्रेत समाज परिवर्तन करण्यात कमी पडलो

आंबेडकरांना अभिप्रेत समाज परिवर्तन करण्यात कमी पडलो

ठळक मुद्देसोहनलाल गिंडा : पुलगावात बुद्धिस्ट फेस्टिव्हल

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शिका, संघटित व्हा आणि जातीभेद, विषमतेची दरी बुजवून अंधश्रद्धा अज्ञानातून बाहेर पडून अखंड भारत तयार होण्याचा विचार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला असला तरी यांना अभिप्रेत असलेले समाजपरिवर्तन करण्यास आपण कमी पडलो आहे, अशी खंत बुद्धिस्ट इंटरनॅशनल मिशन जालंधरचे अध्यक्ष सोहनलाल गिंडा यांनी व्यक्त केली.
पुलगाव येथील बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूल येथे पार पडलेल्या फेस्टीवलमध्ये ते बोलत होते. या फेस्टीवलचे उदघाटन समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर विजय मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन बागडे, चंद्रसेन डोंगरे, डॉ. सुभाष खंडारे, राजरत्न कुंभारे, भारत रंगारी, राजकुमार बेलसरे, किशोर येसनकार, देवानंद गायगवळी, सरपंच वनिता शिंगणापुरे, वहिदा शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रसेन डोंगरे यांनी केले. संचालन प्रा. लता डोंगरे यांनी केले. याप्रसंगी प्रणव गायगवळी यांच्या इंद्रीयधुंद पुस्तकाचे प्रकाशन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. तसेच फेस्टीवलच्या दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथील मिलिंंद महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या व सध्या विविध क्षेत्रात कार्यरत माजी विद्यार्थी मेळावा पार पडला.
सोहनलाल गिंडा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या मेळाव्यात गोवर्धन भगत, शिवदास वासे, शुद्धोदन मून, सुमंत भारसाकळे, प्रमोद थोरात, सुनील बोरडे, डॉ. विजय माहुरे, केलास वानखडे, जाधव, चंद्रसेन डोंगरे उपस्थित होते. याप्रसंगी या माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करुन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. विजय माहुरे यांनी शाळेला ५० हजारांची मदत आणि दोन विद्यार्थ्यांचा खर्च देण्याची तसेच चंद्रसेन डोंगरे यांनी २५ हजाराची देणगी जाहीर केली. बौद्धधर्म प्रसारात महिलांचा योगदान या विषयावर महिला परिसंवाद घेण्यात आला. यात प्रा. डॉ. सरोज आगलावे, प्रा. विशाखा कांबळे, सुहास खंडारे, प्रा. अलका, डोंगरे, डॉ. सुरेखा तायडे, प्रा. लता डोंगरे, संजीवनी रंगारी सहभागी होते. जगाची घडी बसविण्यासाठी एकच धर्म तो म्हणजे बौध्द धर्म असून स्त्री पुरूष समानतेच्या आजच्या काळात महिलांनी आपली जबाबदारी ओळखून सक्षम व्हावे. संचालन डॉ. माहुरे, डॉ. लता डोंगरे यांनी केले. समारोपीय कार्यक्रम माजी मंत्री सुलेखा कुंभारे, सोहनलाल गिंंडा, जयकिरणसिंग, प्रा. सुभाष चहांदे यांच्या उपस्थितीत झाला.
 

Web Title: Ambedkar's intention was not to transform society