शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सत्तरीच्या उंबरठ्यावर त्यांनी जोपासला वनसंवर्धनाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:00 IST

शेख बाबा हे उच्च शिक्षित असून यांना वनस्पतीसह विविध क्षेत्रातील ज्ञान आहे. अशातच त्यांना वेगवेगळ्या वनस्पती जोपासण्याचा छंद जडल्याचे ते सांगतात. त्यांनी बºयाच वनस्पतीचे बिजारोपण केले. तर काही कलमांचे क्रॉस करून वेगवेगळ्या जातीच्या कलमा तयार केल्यात. हल्ली त्यांच्याकडे किमान ५० ते ५५ प्रजातींच्या वनस्पती उपलब्ध आहे.

ठळक मुद्दे५० वनौषधीसह द्राक्षांची बाग फुलविली : शेख बाबाचा छंद अनेकांसाठी ठरतोय प्रेरणादायी

विनोद घोडे।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : एखादा छंद दुसऱ्यांसाठी कसा फायद्याचा ठरू शकतो याचे जिवंत उदाहरण वृद्ध शेतकरी शेख बाबा हे जोपासत असलेल्या छंदाची माहिती जाणून घेतल्यावर दिसून आले. ७० वर्ष वयाचे शेख बाबा यांच्याकडे सध्या सुमारे ५० प्रजातीच्या वनस्पती असून त्याचे संवर्धन ते करीत आहेत.आनंदमय जीवन जगत असताना शेख बाबा यांना वेगवेगळ्या वनस्पती जोपासन्याचा आगळा वेगळा छंद जडला. शेख बाबा हे उच्च शिक्षित असून यांना वनस्पतीसह विविध क्षेत्रातील ज्ञान आहे. अशातच त्यांना वेगवेगळ्या वनस्पती जोपासण्याचा छंद जडल्याचे ते सांगतात. त्यांनी बºयाच वनस्पतीचे बिजारोपण केले. तर काही कलमांचे क्रॉस करून वेगवेगळ्या जातीच्या कलमा तयार केल्यात. हल्ली त्यांच्याकडे किमान ५० ते ५५ प्रजातींच्या वनस्पती उपलब्ध आहे. शेख बाबा यांच्याकडे प्रामुख्याने रामफळ, सिताफळ, शेवगा, पेरू, अंजीर, नारळ, फणस, लिंबू, सुईलिंबू, द्राक्षाचा वेल, वावडींग, गुलवेल, हळद, मिठा पानवेल, वांगे, टमाटर, मिरची, बारमाही फुल येणारे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब, जास्वंद, शेवंती सर्व बी व कलमांची नैसर्गिक पद्धतीने लावून केल्या जाते.तसेच तुळस, आकर्षक रंगीन धोपा, कढीपत्ता, आंबे, (घुई पासून तयार केलेले) पुदीना, एप्रिल फुल, चांदनी फुल आदी वनस्पती त्यांच्याकडे आहेत. हल्ली द्राक्षेच्या वेलींना द्राक्षेचे घोस लागले आहे. यामुळे यांचा छंद परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ते बिजारोपण करून तयार झालेली रोपे इतरांनाही नि:शुल्क देत असल्याचे शेख बाबा यांनी लोकमतला सांगितले. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती