शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

शेतात पाणी गेल्यावर कळवा, नदीपात्राचे खोलीकरण करू

By admin | Updated: May 8, 2015 01:54 IST

नदी काठावर गाव असलेल्या ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगावे लागते़ पुराचा धोका होऊ नये म्हणून ...

झडशी : नदी काठावर गाव असलेल्या ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगावे लागते़ पुराचा धोका होऊ नये म्हणून नदीपात्राच्या खोलीकरण व रूंदीकरणाची मागणी होत आहे; पण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसते़ सध्या उमरगाव येथील ग्रामस्थांना प्रकल्प प्रबंधकाच्या तुघलकी कारभाराचा फटका बसत असून नदी खोलीकरणाचे काम बंद करण्यात आले आहे़ यामुळे यंदाही पुराचा व शेतात पाणी शिरण्याचा धोका कायम राहणार असल्याचे दिसते़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ काही वर्षांपासून झडशीच्या नदी काठावरील ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन रात्र काढावी लागत आहे़ पंचधारा नदीला पूर आला की नदीकाठच्या घरात पाणी शिरत होते़ शेत शिवारातील नाल्यांचा पाण्याचा प्रवाहही याच नदीला मिळून नदी काठावरील शेतात पाणी शिरून पिकाचे नुकसान होते होते; पण अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही़ उलट शेती पडीत ठेवावी लागत आहे़ दरवर्षी होणारे नुकसान टळावे, शेती करता यावी म्हणून शेतकऱ्यांनी नदीपात्र रूंदीकरण व खोलीकरण कामासाठी वैयक्तिक व सामूहिक परवानगी मागितली़ पाटबंधारे विभागाने विलंबाने का होईना परवानगी दिली़ यात सरपंचाचा पुढाकार महत्त्वाचा ठरला़ नागरिकांनी लोकवर्गणी गोळा केली़ यामुळे बजाज फाऊंडेशन संस्थेने नदीचे खोलीकरण व रूंदीकरण कामास गतवर्षी सुरूवात केली़ आतापर्यंत ९०० ते १००० मिटरचे काम झाले़ झडशी-सेलू मार्गावरील पुलाच्या समोरील मौजा उमरगाव परिसरातील काम शिल्लक राहिले आहे़ हे काम करण्यास प्रकल्प प्रबंधक नकार देत असल्याने ग्रामस्थांची गोची झाली आहे़ उमरगावचे शेतकरी बजाज फाऊंडेशनमार्फत काम करून घेण्यास दोन वर्षांपासून उत्सुक होते़ संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांची भेटही घेतली़ पाटबंधारे विभागाची मंजुरीही आणली़ शिवाय शेतकरी लोकवर्गणी देण्यास तयार आहे; पण प्रकल्प प्रबंधकाने समोरील काम पूर्ण न करता बंद पडले़ यामुळे शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे़(वार्ताहर)