शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपाला वीज जोडणी नसतानाही आले देयक

By admin | Updated: October 26, 2014 22:44 IST

तालुक्यातील येरणगाव येथील विनोद पांडुरंग सुपारे यांनी सहा वर्षांपूर्वी कृषी पंपासाठी वीज जोडणीची मागणी वीज वितरण कपंनीला केली होती. त्यांना अद्याप प्रत्यक्षात वीज जोडणी देण्यात आली नाही;

हिंगणघाट : तालुक्यातील येरणगाव येथील विनोद पांडुरंग सुपारे यांनी सहा वर्षांपूर्वी कृषी पंपासाठी वीज जोडणीची मागणी वीज वितरण कपंनीला केली होती. त्यांना अद्याप प्रत्यक्षात वीज जोडणी देण्यात आली नाही; परंतु २०११ पासूनच्या थकबाकीचे देयक मात्र सुपारे यांना पाठविण्यात आले. त्यांची थकबाकी सहा हजार ९१० रुपये असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यामुळे सुपारे अवाक् झाले आहेत. हिंगणघाट उपविभागातील वडनेर वीज वितरण केंद्रांतर्गत येणाऱ्या येरणगाव येथील विनोद सुपारे यांनी ११ डिसेंबर २००८ रोजी कृषी पंपासाठी वीज जोडणीचा अर्ज केला होता. त्यानंतर सुपारे यांनी संबंधित अभियंत्याकडे जोडणी मिळण्यासाठी बरेचदा विनंती केली; परंतु विजपुरवठा झाला नाही. पर्यायाने त्यांना विहिरीत पाणी असून सुद्धा पिकाचे ओलित करता आले नाही. त्यामुळे त्यांचे दरवर्षीच्या हंगामात उत्पन्न कमी होवून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अशास्थितीत त्यांना वीज वितरण कंपनीकडून थकीत बिलाचे त्वरीत भरणा करण्याचे माणगीपत्र मिळाल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी त्वरीत वडनेर येथे जावून अभियत्यांची भेट घेतली असता २०११ पासून कनेक्शन कागदोपत्री देण्यात आल्याची माहिती मिळाली. परंतु प्रत्यक्षात मात्र विहिरीवरील मोटार पंपाला वीज पुरवठा नाही. त्यामुळे तीन वर्षात झालेल्या आर्थिक नुकसानीला वीज वितरण कंपनीला जबाबदार ठरवून नुकसान भरपाईची व विजपुरवठा न करता दिलेले थकबाकीचे बोगस देयक रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी वीजवितरण कंपनीला प्रत्यक्षात वीज जोडणी त्वरीत करण्याची मागणी सुद्धा केली आहे. यासंदर्भात त्वरीत न्याय न मिळाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे सदर शेतकऱ्याची मनस्थिती ढासळत असून विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)