शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महात्मांचे तत्त्व पाळण्यापेक्षा अंगिकारणे फायद्याचे!

By admin | Updated: September 18, 2014 23:38 IST

महात्मा गांधी यांनी सुखकर आणि सोपे जीवन जगण्याची अनेक तत्त्वे दिली आहेत. तत्त्वे पाळण्यापेक्षा ती आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या या तत्त्वाचा आम्ही अंगिकार केल्याने आमचे जीवन सुकर झाले आहे.

सेवाग्राम : महात्मा गांधी यांनी सुखकर आणि सोपे जीवन जगण्याची अनेक तत्त्वे दिली आहेत. तत्त्वे पाळण्यापेक्षा ती आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या या तत्त्वाचा आम्ही अंगिकार केल्याने आमचे जीवन सुकर झाले आहे. आजच्या धकाधकीच्या व गतीमान झालेल्या जीवनात त्यांची तत्त्वे महत्त्वाची ठरतात, असे विचार राष्ट्रपिता महत्मा गांधी यांची नात ताराबहन भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. सेवाग्राम आश्रमला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत बापुंच्या वास्तू व त्यांच्या वापरातील वस्तूंची पाहणी करून आश्रमवासियांशी मुक्त संवाद साधला. ताराबहन ९० वर्षांच्या असून बापुंचे धाकटे पुत्र देवदास यांची मुलगी आहे. सध्या त्यांचे वास्तव्य दिल्ली येथे आहे. आश्रमात आल्यानंतर अध्यक्ष जयवंत मठकर तसेच साधक व कार्यकर्त्यांनी सूतमाळ तथा खादीची शाल देवून त्यांचे स्वागत केले. आदी निवास, बा व बापू कुटी, आखरी निवास तसेच त्यांच्या मोठ्या आई व वडील रामदास तसेच निर्मला गांधी यांच्या निवासस्थानाचीही पाहणी केली. वास्तुंच्या ठिकाणाचे फलकमात्र आवर्जून वाचले. आश्रमवासी आणि कार्यकर्त्यांशी बोलतांना फलकावरील सूचनांचे आमच्या घरात पालन होत होते. बापूंना आम्ही खूप घाबरायचो, तर मोटी बा (कस्तुरबा) मात्र खूप प्रेमळ होत्या. बारीक सारीक गोष्टींकडे बापुंचे लक्ष असायचे. सामान्यपणे आमची कामे आम्ही लहानपणापासून करीत आलो. त्यामुळे कामाचा, श्रमचा कमीपणा वाटला नाही. पागल दौड फलकाबाबत त्या म्हणाल्या बापूंनी त्यावेळी हे सांगितले पण आजचा विचार केला तर खऱ्या अर्थानी आजच त्याची गरज असल्याचे प्रकर्षाने वाटते. बापुंचा आश्रम चांगल्याप्रकारे सांभाळत असल्याबद्दन आनंद व्यक्त केला. परिचय व माहिती जयवंत मठकर यांनी दिली. यावेळी अशोक गिरी, बाबाराव खैरकर, नामदेव ढोक, प्रभाकर आत्राम, सिध्देश्वर, शेरखॉँ पठान, प्रशांत, हिराभाई, ललीता, शोभा, वैशाली आत्राम, प्रभा, अश्विनी, जयश्री पाटील, माया ताकसांडे यांच्यासह आश्रमप्रतिष्ठाणचे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)