शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

७५३ रुग्णांच्या तपासणीत ३६ संशयित कुष्ठरुग्ण

By admin | Updated: February 3, 2015 23:01 IST

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेंतर्गत जिल्ह्यात रोगनिदान शिबिरांच्या माध्यमातून कुष्ठरूग्णांचा शोध घेण्यात येत आहे. यावेळी ७५३ लोकांची तपासणी करण्यात आली. यात त्वचाविकाराचे ३६ संशयित रूग्ण आढळले.

वर्धा : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेंतर्गत जिल्ह्यात रोगनिदान शिबिरांच्या माध्यमातून कुष्ठरूग्णांचा शोध घेण्यात येत आहे. यावेळी ७५३ लोकांची तपासणी करण्यात आली. यात त्वचाविकाराचे ३६ संशयित रूग्ण आढळले. कुष्ठरोग शोध मोहिमेत जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य सेवा कुष्ठरोग तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने कुष्ठरोग निवारण मोहिमेचा शुभारंभ सेवाग्राम येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. कुष्ठरोग निर्मूलन व शोध मोहिमेत जनतेलाही सहभागी मुनगंटीवार यांनी केले. १५ फेबु्रवारी पर्यंत ग्रामीण व शहरी भागात जनजागृती अभियान राबवून कुष्ठरोग असलेल्या रुग्णांचा शोध घेवून त्यांचेवर तात्काळ उपचार सुरू करा. कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचे जनजागृतीचा भाग म्हणून जिल्हा स्तरावर रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. चव्हाण व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी हिरवी झेंडी दाखविली. तालुका स्तरावर मोहिमेचे जनजागरण म्हणून रॅलीचे आयोजन करण्यात आले. १५ फेब्रुवारी पर्यंत शहरी व ग्रामीण भागामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मेळावा, बचत गट, हायस्कूलमध्ये प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, बाजार व बसस्थानक, रेल्वे स्टेशन प्रदर्शन, अंगणवाडी भेट, शासकीय कार्यालय भेट, शाळा व आश्रम शाळा भेट इत्यादी प्रकारे जनजागरण करण्यात येत आहे. यावेळी खासदार रामदास तडस, जि.प. अध्यक्ष चित्रा रननवरे, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी एन.नवीन सोना, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, आरोग्य सभापती मिलिंद भेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, डॉ. कुचेवार आदी मान्यवर उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)