शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्रामातील ‘फ्रिडम रन’ मध्ये धावले ७५ युवक-युवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा होत असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये ‘फ्रिडम रन’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या महात्मा गांधी आश्रमाची निवड करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्पोर्ट्स असोसिएशन आणि नेहरु युवा केंद्राच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : देशाच्या स्वातत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्षानिमित्त देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. या अनुषंगाने भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ‘फिट इंडिया, फ्रि डम रन २.०’ चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सेवाग्राममध्येही चरखा गृहापासून सेवाग्रामपर्यंत ७५ युवक-युवती धावल्यात. खासदार रामदास तडस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा होत असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये ‘फ्रिडम रन’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या महात्मा गांधी आश्रमाची निवड करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्पोर्ट्स असोसिएशन आणि नेहरु युवा केंद्राच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. देशासाठी युवक हा महत्त्वाचा असल्याने तो फिट राहणे आवश्यक आहे. प्रत्येकांना स्वत: च्या आरोग्यासाठी अर्धातास काढून फिटनेससाठी दिला पाहिजे. तेव्हाच इंडीया फिट राहील, असे मत खासदार तडस यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ललिता लेकुरवाळे, युवा केंद्राचे माजी समन्वयक संजय माटे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, सतीश इंगोले, अनिल निमसडे, बडगिलवार, प्रवीण पेटे, नलिनी भोंगाडे, प्रितेश रामटेके, बाळकृष्ण हांडे आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने या उपक्रमाची सुरुवात झाली. खा. तडस यांनी हुतात्मा स्मारक परिसरात निसर्ग सेवा समितीच्यावतीने वृक्षारोपण केले. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या यात्री निवास सभागृहात या कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू तर प्रमुख अतिथी म्हणून नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा, माजी समन्वयक संजय माटे, जिल्हा क्रीडा अधिकारी ललिता लेकुरवाळे, अनिल निमगडे, सतिश इंगोले, नलिनी भोंगाडे आदी उपस्थित होते. यावेळी यामध्ये सहभागी सर्वांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा व संचालन जयश्री भोयर यांनी केले तर आभार अनिल निमगडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता नेहरु युवा केंद्राचे पर्यवेक्षक दयाराम रामटेके, अमोल चावरे, दिक्षांत टेंभरे, ऐश्र्वर्या भोयर, मृणाली बुडे तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयाचे रवी काकडे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात ७५ गावातील ७५ युवक-युवतींचा सहभाग राहिला आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमाअंतर्गत २  ऑक्टोबरपर्यंत ७४४ जिल्ह्यांमध्ये ‘फ्रिडम रन’ होणार असल्याचे शिवधन वर्मा यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sewagramसेवाग्रामRamdas Tadasरामदास तडस