जि.प.च्या शाळांत पदवीधर शिक्षकांची ४५१ नवीन पदे

By Admin | Updated: May 23, 2014 00:06 IST2014-05-23T00:06:50+5:302014-05-23T00:06:50+5:30

शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्हा परिषदांच्या शाळांकरिता शिक्षक निर्धारणाचे कार्य अल्पावधीतच पूर्ण केले जाणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना जोडल्या गेलेल्या इयत्ता सहावी ते

451 new posts of graduate teachers in ZP schools | जि.प.च्या शाळांत पदवीधर शिक्षकांची ४५१ नवीन पदे

जि.प.च्या शाळांत पदवीधर शिक्षकांची ४५१ नवीन पदे

वर्धा : शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्हा परिषदांच्या शाळांकरिता शिक्षक निर्धारणाचे कार्य अल्पावधीतच पूर्ण केले जाणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना जोडल्या गेलेल्या इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पदवीधर शिक्षकांची ४५१ नवीन पदे कार्यरत पात्र सहायक शिक्षकांमधून भरली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांनी दिली. शिक्षण हक्क कायद्यानुसार होवू घातलेल्या शिक्षक निर्धारण, शिक्षकांचे समायोजन, पुढील शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन आणि शालार्थ वेतन प्रणाली संबंधाने प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींनी शिक्षणाधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या पदावर १४ शिक्षकांची पदोन्नती करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी तेलंग यांनी या बैठकीत सांगितले. सध्या जिल्ह्यात २६२ उच्च श्रेणी मुख्याध्यापक कार्यरत असून शिक्षण हक्क कायद्याच्या संच मान्यतेनुसार ५९ पदे कायम राहणार आहेत. उर्वरित अतिरिक्त ठरणार्‍या २०३ उच्चश्रेणी मुख्याध्यापकांना वेतन संरक्षण देवून सामावून घेण्याची मागणी यावेळी समितीने केली. शालार्थ वेतन प्रणालीप्रमाणे होणारे वेतनास विलंब होत असल्याबाबत शिक्षक समितीच्या पदाधिकार्‍यांनी तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली. नवीन अभ्यासक्रमाची प्रशिक्षणे व पुढील वर्षी करायच्या वार्षिक नियोजनाकरिता शिक्षक पदांचे निर्धारण, नियुक्ती आणि समायोजन कार्यवाहीची मागणी समितीने केली.(प्रतिनिधी)

Web Title: 451 new posts of graduate teachers in ZP schools