शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांकरिता ४० कोटी

By admin | Updated: July 27, 2014 23:53 IST

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्य शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात वाढ करून आर्थिक पाठबळ वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याच माध्यमातून विशेष घटक

शासन निर्णय : आर्थिक पाठबळ वाढविण्याचा प्रयत्नगौरव देशमुख - वायगाव (नि.)राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्य शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात वाढ करून आर्थिक पाठबळ वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याच माध्यमातून विशेष घटक योजनेंतर्गत सन २०१४ करीता या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी वित्त विभागाने ३९ कोटी ९ लाख ५८ हजार रुपयांच्या योजनेस मान्यता दिली आहे.या निधीतून शेतकऱ्यांना जमीन सुधारणा, पीक सरक्षण औजारे, बैलजोडी, बैलबंडी, बोरवेल, जुनी विहीर दुरूस्ती, पाईपलाईन, तारपत्री, नवीन विहीर यासारखे इतर साहित्य अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ होऊन त्यांचे जीवन हे दारिद्र्य रेषेबाहेर आणण्यासाठी शासन स्तरावरून विविध योजना राबविण्यात येत आहेत. याच माध्यमातून कृषी विभागामार्फत विशेष घटक योजनेंतर्गत सन १९८२ पासून राज्यामध्ये अर्थसहाय्य योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून १७६ कोटी ३९ लाख ९२ हजाराच्या निधीची तरतुद करण्यात आली असली तरी वित्त विभागाने मात्र ३९ कोटी ९ लाख ९८ हजाराला मंजुरी दिली आहे.या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये फलोत्पादन विकास आराखडा स्वर्गीय दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेंतर्गत या जातीतील नागरिकांना चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमिनीचे वाटप अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना देय अनुदानाची रक्कम आलेल्या लाभार्थ्यांना देय अनुदानाची रक्कम रोख स्वरुपात न देता ती वस्तुस्वरुपात वितरित करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या घटकासाठीच निधी देण्यात यावा, यासाठी लाभार्थ्यांना याबाबत विचारणा करण्याचा ठराव घेण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून जे लाभार्थी नवीन विहिरीचा लाभ घेणार आहेत. त्याच्यासाठी ७० हजार ते एक लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भुजल सर्वेक्षणानुसार देय राहणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांसाठी योजना राबविण्याचा कालावधी हा दोन वर्षांचा राहणार आहे.या दोन वर्षांच्या कालावधीत लाभ देण्यात येण्यासाठी सन २०१३-१४ मधील अपूर्ण लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रथमच पूर्ण लाभ देवून उर्वरीत अनुदानातून सन २०१४-१५ मध्ये निवडलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सन २०१३-१४ पुर्वीच्या अपूर्ण कामांना अनुदान न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न असला तरी शासकीय अधिकारी यात कितपत कार्य करतात याकडे लक्ष आहे.