३६ वाहकांना भोवली तिकीट चोरी

By Admin | Updated: May 15, 2014 01:45 IST2014-05-15T01:45:26+5:302014-05-15T01:45:26+5:30

परिवहन महामंडळाच्या बसमध्ये पैसे वसूल केल्यानंतर प्रवाशांना तिकीट न देणार्‍या वाहकावर कारवाई करण्यात आली. मोबाईलच्या साह्याने एकमेकांना संदेश देत तिकीट तपासणीसांची ..

36 carrier steals tickets | ३६ वाहकांना भोवली तिकीट चोरी

३६ वाहकांना भोवली तिकीट चोरी

परिवहन महामंडळ : पोलिसांनी केले सहकार्य

वर्धा : परिवहन महामंडळाच्या बसमध्ये पैसे वसूल केल्यानंतर प्रवाशांना तिकीट न देणार्‍या वाहकावर कारवाई करण्यात आली. मोबाईलच्या साह्याने एकमेकांना संदेश देत तिकीट तपासणीसांची माहिती देण्याच्या एका प्रकरणात तब्बल ३६ वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामुळे तिकीट चोरी करणार्‍या वाहकांना चपराक बसली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो बसेस गावांपासून शहरापर्यंत सेवा देतात. प्रवास भाड्यापोटी ठराविक दर आकारलेले तिकीट वाहक प्रवाशांना देतात; पण अनेक वाहक तिकीट चोरीचे प्रकार करतात. प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे वसूल करीत त्यांना तिकीट न देताच पूर्ण प्रवास घडविण्याच्या प्रकाराने महामंडळाला हजारो रुपयांचा चुना लागतो. यास आळा घालण्यासाठी बस तपासणी मोहीम राबविण्यासह आकस्मिक तपासणीही केली जाते. याचा काही अंशी वरकरणी धाक असला तरी तिकीट तपासणीसांचेच लोकेशन घेत तिकीट चोरी करण्याचा प्रकार काही वाहकांनी चालविला होता. मागील वर्षी याचे बिंग फुटले व तब्बल ३६ वाहक यात अडकले. तिकीट तपासणीसांचे मोबाईलवर लोकेशन घेत त्यानुसार तिकीट चोरीचा उपद्रव करणार्‍या ३६ वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.(कार्यालय प्रतिनिधी)

वाहकांवर जी कारवाईकरण्यात आली, ती योग्य आहे. ते मोबाईलद्वारे मॅसेज करून सर्व वाहकांना अलर्ट करीत होते. याबाबतची चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला होता. यात पोलिसांचे चांगले सहकार्य मिळाले. या वाहकांवर कडक कारवाईकरण्यात येणार आहे.
- व्ही.टी. गव्हाळे, विभाग नियंत्रक, परिवहन महामंडळ, वर्धा.
 

Web Title: 36 carrier steals tickets