शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

विविध कारवाईत ३.२८ लाखांचा दारूसाठा जप्त

By admin | Updated: June 13, 2016 00:41 IST

जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून केलेल्या कारवाईत वाहनांसह ३. २८ लाखाचा दारूसाठा जप्त केला.

सहा आरोपी अटकेत : जिल्ह्यात धाडसत्र सुरूचवर्धा : जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून केलेल्या कारवाईत वाहनांसह ३. २८ लाखाचा दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी सहा जनांवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.देशी आणि विदेशी दारूचा साठा घेऊन जात असताना हिंगणघाट पोलिसांनी मालवाहू एम.एच.३२ सी.९५५८ ची तपासणी केली. अमित दासरवार (२६) रा. तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट हा त्याच्या साथीदार बॉबी ऊर्फ राहुल विठ्ठल पंडित (३०) यासह वाहनातून सिंदी (रे.) पोलीस स्टेशन या मार्गाने दारूचा साठा हिंगणघाट येथे विक्रीकरिता आणीत आहे. या माहितीवरून सिंदी (रे.) हद्दीत नाकाबंदी करून वाहनाची झडती घेतली. यातून १८० मिलिच्या १४४ बाटल्या असा २८ हजार ८०० रूपये, देशी दारूच्या १८० मिलिच्या ९६ निप किंमत ९ हजार ६०० रूपये, दोन मोबाईल आणि मालवाहक असा एकुण १ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.आरोपीवर सिंदी (रे.) पोलिसात कलम ६५ (अ) (ई), ७७ (अ), ८२ मुदाका सहकलम (३) (१), १८१, १३०/१७७ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल व अप्पर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अचलकुमार मलकापुरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कडू, दिनेश तुमाणे, संजय बोगा, तुषार भुते, भूषण पुरी यांनी केली आहे. या कारवाईने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांकडून वॉश आऊट मोहीम राबविली जात आहे.(स्थानिक प्रतिनिधी)कारसह १.७८ लाखाचा दारूसाठा जप्तहिंगणघाट - शहराच्या मध्यवस्तीत पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत कारसह १ लाख ७८ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नन्नाशाहा वॉर्डाकडे जाणाऱ्या मार्गावर शनिवारी ही कारवाई केली. कार एमएच ३१ सीआर ८९१४ ला थांबवुन पाहणी केली असता २८ हजार ८०० रूपये किमतीची देशीदारू हस्तगत केली. याप्रकरणी आकाश हरीश दुबे (१९) रा. संत्रा मार्केट नागपूर व राकेश बापूराव सोरटे (१६) रा. तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट या दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार विवेक लोणकर, जमादार मारोती उईके, धर्मेंद्र तोमर, गजेंद्र धरमे, राजेश तिवस्कर, सतीश नंदागवळी, समीर कामडी यांच्या पथकाने ही कारवाई केली.