शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणबाळ योजनेची २८४ प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: June 2, 2014 01:38 IST

येथील तहसील कार्यालयात अनेक वर्षांपासून श्रावणबाळ योजनेची तसेच संजय गांधी

कारंजा (घाडगे) : येथील तहसील कार्यालयात अनेक वर्षांपासून श्रावणबाळ योजनेची तसेच संजय गांधी निराधार योजनेची शेकडो प्रकरणे शासकीय दिरंगाईमुळे प्रलंबित आहेत. यामुळे लाभार्थ्यांंना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नियमात बसत नसतील ती प्रकरणे बाजूला काढून वाजवी प्रकरणे मंजूर करण्याचे औदार्य संबंधीत अधिकारी दाखवायला तयार नाहीत. त्यामुळे वृद्ध आणि आधार नसलेले अनेक ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. मंजुरीसाठी तहसील कार्यालयाचे दरवाजे झिजवून कंबरडे मोडकळीस आले आहेत.

सतत दोन वर्षांपासून श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या समितीची सभा कधीही नियमीत झालेली नाही. अशातही कमिटीने प्रकरणे मंजूर केली तरी तत्कालीन नायब तहसीलदारांनी अधिकार वापरून अगदी जुजबी कारणासाठी मंजुरी नाकारली. परिणामी साडेतिनशेच्या असापास श्रावणबाळ व दोनशेच्या आसपास संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे प्रलंबित आहेत. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता उपविभागीय अधिकार्‍यांनी नायब तहसीलदार राठोड यांना प्रकरणे त्वरीत मंजूर करण्याचे आदेश दिले. २२ जानेवारी २0१४ ला समितीची विशेष सभा घेवून श्रावण बाळ योजनेची २0 तर संजय गांधी योजनेची ४0 प्रकरणे मंजूर करण्यात आली. उरलेल्या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी असल्यामुळे त्या पूर्ण करण्याचे लाभार्थ्यांंना सांगण्यात आले.

आज स्थितीला श्रावण बाळ योजनेची २८४ तर संजय गांधी योजनेची अनेक प्रकरणे मंजुरीकरिता प्रलंबीत आहेत. या विभागात नायब तहसीलदार खिराळे काम सांभाळत आहे. मदतीला एक लिपीक आहे, चपराशी नाही. प्रकरणाची वाढती संख्या आणि इतर प्रशासकीय कामांमुळे प्रकरण मंजुरीस वेळ लागत आहे. दर तीन महिन्याला समितीची बैठक घेवून प्रकरणे निकाली काढणे आवश्यक आहे.(तालुका प्रतिनिधी)