शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

२४ जणांचे मुंडण, युवक काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: September 19, 2015 03:19 IST

तालुक्यातील तळेगाव(टा.) ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषण ...

तळेगाव प्रकरण : सीईओ अहवालावर सुनावणी घेणारवर्धा : तालुक्यातील तळेगाव(टा.) ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनादरम्यान शुक्रवारी आंदोलकांसह २४ जणांनी मुंडण करून आंदोलनाची धार तीव्र केली आहे.देवळी-पुलगाव विधानसभा युवा काँग्रेसने मोर्चाच्या माध्यमातून जि.प.वर धडक दिली. शिष्टमंडळाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना यांची घेतली. याप्रसंगी सीईओ मिना यांनी चौकशी अहवाल दुपारपर्यंत जाहीर करण्याची ग्वाही दिली होती, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने आंदोलक अहवालाची वाट बघत होते.मोर्चात माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, कॉग्रसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, जि.प. गटनेते मारेश्वर खोडके, जि.प. सदस्य मनोज चांदुरकर, मोहन शिरोडकर, निलिमा दंढारे, वर्धा पं.स. सभापती कुंदाताई भोयर, पुलगाव नगराध्यक्ष मनीष साहु, माजी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश तेलरांधे, लोकसभा महासचिव सुधीर वसु, जावेद खान, एनएसयुआय अध्यक्ष हितेश इंगोले, विधानसभा महासचिव मोहन नावाडे, धिरज भोयर, सचिन गुप्ता, सोनू गावंडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.उपोषणात माजी सरपंच माणिकराव भोयर यांनी आज सहभाग नोंदविला. मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनीही उपोषण मंडपाला भेट घेऊन उपोषणकर्त्यांची मागणी समजून घेतली. यानंतर त्यांनीही आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे. वाढता पाठींबा बघता आंदोलन दिवसागणिक तीव्र होत असल्याचे दिसून येते. या अनुषंगाने प्रशासनानेही आता गंभीर पाऊले उचलायला सुरुवात केल्याचे समजते. १५ सप्टेंबरपासून तळेगावातील १७ ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले. यानंतर आंदोलकांची संख्या वाढतच आहे. आंदोलनाला चार दिवस लोटले असून अद्याप तोडगा निघालेला नाही. अशातच आज आंदोलकांनी सामूहिक मुंडण करून आंदोलनाची तीव्रता वाढविली. यामध्ये उल्हास सुरकार, हिरामण कांबळे, हर्षल पाटील यांनी स्वयंस्फूर्तीने मुंडण केले.(जिल्हा प्रतिनिधी)आमदारही आंदोलनात उतरणारजिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या तळेगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाचे वाढते गांभीर्य लक्षात घेऊन काँग्रेसनेही आपला पाठींबा जाहीर केला आहे. आता देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार रणजित कांबळे हे सुद्धा या आंदोलनात उतरणार असल्याची माहिती आहे. ते सीईओंच्या अहवालाबाबत शनिवारी चर्चा करुन आंदोलनाची पुढील रुपरेषा ठरविणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या सूत्राने ‘लोकमत’ली दिली.मनसेचीही आंदोलनात उडीआंदोलनाला सुरुवातीपासूनच विविध राजकीय पक्षांचा वाढता पाठींबा मिळत आहे. या आंदोलनात आता मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी शुक्रवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आपला पाठींबा जाहीर केला आहे.आज आंदोलनाची सांगता होण्याची शक्यता?आंदोलनाला चार दिवस उलटले असले तरी आंदोलनाची तीव्रता वाढतच आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहे. यावरुन शनिवारी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली आहे.