शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव पोलिसात अवैध वाहतुकीचे २,२५७ गुन्हे

By admin | Updated: November 3, 2014 23:30 IST

शहरात वाहतूक नियमांचे अल्लंघन करून अवैध वाहतूक करणाऱ्या २ हजार २५७ वाहन चालकांविरूद्ध विविध कलमांखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात एकूण ६६ हजार १९२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

किरण उपाध्ये - पुलगाव शहरात वाहतूक नियमांचे अल्लंघन करून अवैध वाहतूक करणाऱ्या २ हजार २५७ वाहन चालकांविरूद्ध विविध कलमांखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात एकूण ६६ हजार १९२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गत दहा महिन्यात ही कारवाई करण्यात आली असून यावेळी प्रथमच स्कूल व्हॅनवर कारवाई केली आहे.लोकसंख्या वाढीच्या पाठोपाठ गावाचे शहरीकरण झाले आहे. शहर आणि ग्रामीण भागात वाहनांची संख्या वाढली आहे. कॉन्व्हेंट, शाळा, महाविद्यालये वाढल्याने स्कूल बस व इतर खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. ही सर्व वाहने चालविणारे चालक वाहतूक नियमाचे पालन करतातच असे नाही. स्कूलव्हॅनवर पिवळ्या रंगाची पट्टी असावी, गतीवर नियंत्रण असावे, विद्यार्थ्यांना वाहनात मोकळे बसता यावे आदी नियमांचे पालन यांच्याकडून होत नसल्याचे शहरात समोर आले आहे. अशाच एका स्कूल बसला झालेल्या अपघातात दोन चिमुकल्यांना नाहक जीव गमवावा लागला होता.त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरूद्ध कारवाईचा बडगा उगारताच स्कूल आॅटो व व्हॅन खरेदी केल्या आहेत. तरीही बेसावधपणे व वेगावर नियंत्रण न ठेवणाऱ्या चालकांविरूद्ध कारवाई होणे गरजेचे आहे. काही वाहनामध्ये गॅसकीट बसविली जात आहे. यामुळे मुलांना चक्कर, मळमळचा त्रास होतो. वाढत्या उन्हात गॅस लिक होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.पोलिसांनी रहदारीस अडथळा निर्माण करणे, दुचाकी वाहनावर दोनपेक्षा अधिक व्यक्ती बसवणे, वाहतूक परवाना (लायसन्स) वा कागदपत्र न बाळगणे, बेजबाबदारपणे भरधाव वाहन चालवणे, वाहनावर नंबर प्लेट न लावणे, आॅटो चालकाने समोरील सीटवर प्रवासी बसवणे, चार चाकी वाहनाच्या काचांवर काळ्या फिल्म बसवणे आदी कारणाखाली कारवाई केली आहे. मात्र अजूनही अवैध वाहतूक आहे त्याच स्थितीत सुरू आहे. पोलिसांची कारवाई सुरू असून यात वेगात व नागमोडी वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणे गरजचे आहे. गत दहा महिन्यात फक्त २४ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यां विरूद्धच कारवाई केल्याची नोंद आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे पोलीस सांगत आहेत.