मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत जिल्ह्याला २१.६९ कोटी

By Admin | Updated: April 22, 2016 04:06 IST2016-04-22T04:06:38+5:302016-04-22T04:06:38+5:30

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्धा जिल्ह्याकरिता २१.६९ कोटी

21.69 crore in the district under the Chief Minister's Gram Sadak Yojana | मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत जिल्ह्याला २१.६९ कोटी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत जिल्ह्याला २१.६९ कोटी

 वर्धा : मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्धा जिल्ह्याकरिता २१.६९ कोटी रुपये मंजूर झाले आहे. या निधीतून जिल्ह्यातील आठही तालुक्यातील विविध १७ रस्त्यांचे काम होणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिली. या संदर्भात त्यांना ग्रामविकास मंत्र्यांचे पत्र आल्याचे त्यांनी कळविले आहे.
या योजनेंतर्गत रस्त्याच्या मजबुतीकरणासह जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी पुरूज्जीवन योजनेत धाम नदीकरिता २ कोटी ६७ लाख, देवळी तालुक्यातील हिवरा या गावाकरिता ८ लाख, कुनबडी गावाकरिता ३ लाख रुपये मंजूर झाल्याबागतची माहितीही त्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. यामुळे जिल्ह्यात गत काही वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.(प्रतिनिधी)

४जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण १७ विविध रस्त्यांचे होणार नवीनीकरण व मजबुतीकरण.
४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी पुरूज्जीवन योजना धाम नदीकरिता २ कोटी ६७ लक्ष रूपये मंजूर

Web Title: 21.69 crore in the district under the Chief Minister's Gram Sadak Yojana