शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

१७ विद्युत प्रवाहित खांब धरणाच्या पाण्यात

By admin | Updated: October 13, 2016 01:15 IST

निम्न वर्धा प्रकल्प विभागाने अत्यल्प मोबदला दिल्याने पुनर्वसनापासून वंचित असलेल्या प्रकल्पबाधित कुटुंबांचा मुक्काम बुडित गावठाणातच आहे.

पुनर्वसनाची व्यथा : महावितरण व प्रकल्प विभागाचे दुर्लक्षआष्टी (शहीद) : निम्न वर्धा प्रकल्प विभागाने अत्यल्प मोबदला दिल्याने पुनर्वसनापासून वंचित असलेल्या प्रकल्पबाधित कुटुंबांचा मुक्काम बुडित गावठाणातच आहे. विद्युत वितरण कंपनीची वीज प्रवाहित लाईनही धरणाच्या पाण्यात बुडाली आहे. आर्वी तालुक्यातील अहिरवाडा गावठाणाच्या सभोवताल १७ जिवंत खांब अद्याप अन्यत्र हलविले नाही. यामुळे धोक्याची शक्यता बळावली आहे.अहिरवाडा गावाचे ५० टक्के पुनर्वसन पूर्ण झाले. उर्वरित ग्रामस्थांना शासनाकडून वाढीव मोबदला मिळण्याची आशा आहे. पूर्वी मिळालेली तुटपूंजी रक्कम खर्च झाल्याने आता घराचे बांधकाम करण्यासाठी बाधित कुटुंबांकडे पैसे नाहीत. यामुळे नाईलाजास्तव जुन्याच गावात राहावे लागत आहे. येथे सुरू असलेल्या वीज पुरवठ्याचे खांब पाण्यात बुडाले आहेत. यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीला माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कुटुंबांचे शासनाने त्वरित पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. वीजसेवा ही प्राथमिक गरज आहे. शासनाने प्रकल्पग्रस्तांना १०० टक्के पुनर्वसन होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करून देणे गरजेचे होते; पण जुने वीज पुरवठ्याचे खांब धरणाच्या पाण्यात बुडाले असताना जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या १७ खांबांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज खांब पाण्यात असल्याची माहिती वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असता दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करू, असे म्हणून अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली आहे. धरणाच्या पाण्यात गावातील लहान मुले पोहायला जातात. गुरांना पाणी पिण्याकरिता घेऊन जावे लागते. महिला कपडे धुण्यासाठी जातात. अशावेळी पाण्यााध्ये वीज प्रवाह संचारल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे. गत कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना लोकप्रतिनिधीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसून येत आहे. ग्रामस्थांच्या जीवावर बेतणारी बाब असतानाही दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विचार करीत पाण्यातील १७ खांबांवरील वीज पुरवठा बंद करून पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)