शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

16 नुकसानग्रस्त कुटुंबांना मिळणार 11.67 लाखांची शासकीय मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

सेलू तालुक्यातील सालई (कला) येथील ललिता शेषराव उईके व देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील रामा पांडुरंग मांगळूकर यांचा वीज पडून मृत्यू झाला. सदर घटना उघडकीस येताच या दोन्ही कुटुंबांना शासकीय मदत मिळावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आला. शासनाने या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठीचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. 

ठळक मुद्देवीज पडल्याने झाले होते मोठे नुकसान : जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यांकडे निधी वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मध्यंतरी वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून तब्बल १५ जनावरे तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. वारसदारांना व पशुपालकांसाठी ११ लाख ६७ हजारांची शासकीय मदत मंजूर झाली असून, ती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेला हा जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे वळता केला आहे. त्यामुळे लवकरच नुकसानग्रस्त कुटुंबांना भरीव आर्थिक मदत मिळणार आहे. सेलू तालुक्यातील सालई (कला) येथील ललिता शेषराव उईके व देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील रामा पांडुरंग मांगळूकर यांचा वीज पडून मृत्यू झाला. सदर घटना उघडकीस येताच या दोन्ही कुटुंबांना शासकीय मदत मिळावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आला. शासनाने या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठीचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. वर्धा तालुक्यात वीज पडून एका जनावराचा, सेलू तालुक्यात तीन, देवळी व आर्वी तालुक्यात प्रत्येकी एक, हिंगणघाट तालुक्यात चार, तर समुद्रपूर तालुक्यात पाच जनावरांचा मृत्यू झाला. या सर्व पशुपालकांना शासकीय मदत मिळावी म्हणून पाठविण्यात आलेले प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी ३६ लाख ७ हजारांचा निधीही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा सर्व निधी जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे वळता केला आहे. त्यामुळे लवकरच नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय आर्थिक मदत मिळणार आहे. हवालदिल कुटुंबियांसाठी शासनाची ही मदत मनोधैर्य वाढविण्यासाठी महत्त्वाचीच ठरणार आहे. 

त्या जखमीच्या प्रस्तावावर वेळीच होणार विचार- वीज पडल्याने कारंजा तालुक्यातील दानापूर येथील विश्वेश्वर आनंद काळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद महसूल विभागाने घेतली असून जखमी काळे यांना शासकीय मदत देण्याचे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. आवश्यक कार्यवाही केल्यानंतरच या कुटुंबाला शासकीय मदत मिळणार आहे.

वीज पडून दाेन मनुष्यांचा तर १५ जनावरांचा मृत्यू झाला. या नुकसानग्रस्त कुटुंबांसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. तो तालुकास्तरावर वळता करण्यात आला आहे. लवकच नुकसानग्रस्तांना तो वितरीत करण्यात येईल.- अर्चना मोरे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजना