शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या १५७ कर्मचाऱ्यांनी केले ‘काम बंद’

By admin | Updated: November 3, 2014 23:30 IST

तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत १५७ कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून पंचायत समितीने थकीत वेतन दिले नाही़ त्यामुळे कुटुंबाचा आर्र्थिक प्रश्न ऐेरणीवर आला आहे़

आष्टी (श़) : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत १५७ कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून पंचायत समितीने थकीत वेतन दिले नाही़ त्यामुळे कुटुंबाचा आर्र्थिक प्रश्न ऐेरणीवर आला आहे़ याप्रकरणी सर्व कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीसमोर कामबंद आंदोलन सुरू केले़ आंदोलनाचा फटका बसल्याचे पाहून गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची सभा घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले़तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना कर्मचारी कार्यरत आहे़ कर्मचारी हा नागरिक व शासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करतात़ परंतु दिवसागणिक अतिरिक्त कामाचा बोजा वाढत असल्यामुळे दिवसभर काम करावे लागते़ त्यातच नियमित पगार मिळत नाही़ या कारणाने उसनवारीवर वर्षभर कुटुंबाचा गाडा हाकावा लागतो. दिवाळीच्या दिवशी घरातील सदस्यांना कपडे घेण्यासाठीदेखील कर्मचाऱ्यांकडे पैसे नसल्याचे वास्तव यंदा पहावयास मिळाले. अनेक ठिकाणी ग्रामसेवक दिवसभर हजर राहत नाही़ त्यांचाही अतिरिक्त पदभारही कर्मचाऱ्याना सांभाळावा लागतो. अशा सगळ्या भानगडी असूनही कर्मचारी आपले काम करीत असतात. शासनाने २०१३ च्या आदेशानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता व सुधारित वेतन देणे आवश्यक होते़ परंतु पंचायत समितीच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्रामसेवकांचे अरेरावी धोरण आडवे आले़ सर्वच ग्रामसेवक शासन आदेशानुसार वेतन द्यायला तयार नसल्याचा आरोप ग्रा़ पं़ कर्मचाऱ्यांनी केला आहे़ १ एप्रिल २०१४ पासून मूळ किमान वेतन लागू करावे, राहणीमान भत्ता द्यावा, सेवाज्येष्ठता यादीत सामावून घ्यावे, कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाची मर्यादा २५ टक्क्यावरून ३५ टक्के करावी, २०११ च्या लोकसंख्येनुसार आकृतिबंधात नव्याने सुधारणा करावी, कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता १०० टक्के अनुदान मिळावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ठराव पारित करावे आदी मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे़ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक सन्मानाची वागणूक देत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी आंदोलनात केला. यामध्ये युनियनचे अध्यक्ष संजय पाथरे, सचिव रवीन्द्र होले, सहभागी होते. गटविकास अधिकाऱ्यांनी सभा घेवून लवकरात लवकर तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)