शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

१३ ठाणेदारांचे खांदेपालट

By admin | Updated: June 15, 2016 02:32 IST

जिल्हा अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. यात इतर कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील १३ ठाणेदारांचे खांदेपालट करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा पराग पोटे, राजेंद्र शिरतोडेंकडे वर्धा वर्धा : जिल्हा अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. यात इतर कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील १३ ठाणेदारांचे खांदेपालट करण्यात आले आहे. या बदल्यांत जिल्ह्यातील गुन्ह्यांचा छडा लावण्याची विशेष कामगिरी बजावणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. पराग पोटे आतापर्यंत सेवाग्राम ठाण्याचे निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी वर्णी लागल्याने सेवाग्राम ठाण्याचे ठाणेदार म्हणून वाचक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जी. के. वासेकर यांची बदली झाली आहे. वर्धा ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर बुराडे यांची पुलगाव येथे तर पुलगावचे ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांची बदली वर्धेचे ठाणेदार म्हणून झाली आहे. तळेगाव (श्यामजीपंत) येथील ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांची बदली वाचक शाखेत झाली तर एटीसी पथकाचे निरीक्षक दीपक साखरे तळेगावचे ठाणेदार झाले आहे. आतापर्यंत नियुक्तीच्या प्रतीक्षेत पोलीस नियंत्रण कक्षात बसलेले अशोक चौधरी आर्वीचे ठाणेदार झाले. आर्वी ठाण्यात कार्यरत असलेले ठाणेदार शैलेंद्र साळवी हिंगणघाट ठाण्याचे निरीक्षक झाले आहेत. जिल्हा विकास शाखेत असलेले विलास काळे यांना सेलूचे ठाणे देण्यात आले आहे. तर सेलू येथे तात्पूरत्या प्रभारावर असलेले भास्कर मसराम यांना अल्लीपूर पोलीस ठाणे देण्यात आले आहे. आतापर्यंत दहेगावचे ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले सुधाकर चव्हाण यांची बदली एटीसी पथकात झाली आहे. दहेगाव येथील ठाणेदार म्हणून अल्लीपूर येथील ठाणेदार भानुदास पिदूरकर यांची वर्णी लागली आहे. नियंत्रण कक्षात असलेल्या शिल्पा भरडे यांच्यावर महिला विशेष सुरक्षा कक्षाचा भार सोपविण्यात आला आहे. बदली झालेल्या कर्मचऱ्यांना तत्काळ रूजू होण्याचे आदेश आहेत. सिंदी (रेल्वे), रामनगर, सावंगी (मेघे), कारंजा (घाडगे), देवळी, गिरड, समुद्रपूर, वडनेर, खरांगणा व आष्टी (शहीद) या ठाण्यांतील ठाणेदारांच्या बदल्या या सत्रात करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)