शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल मॅपिंग योजनेने जोडल्या तालुक्यातील १२६ शाळा

By admin | Updated: September 18, 2014 23:39 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध शैक्षणिक योजना राबविण्यासाठी शासनाला तालुक्यातील शाळांचे स्थान (लोकेशन), संचनालय कार्यालयात किंवा सचिवालय कार्यालयात बसल्या ठिकाणी माहिती व्हावे

अरुण फाळके - कारंजा (घाडगे)सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध शैक्षणिक योजना राबविण्यासाठी शासनाला तालुक्यातील शाळांचे स्थान (लोकेशन), संचनालय कार्यालयात किंवा सचिवालय कार्यालयात बसल्या ठिकाणी माहिती व्हावे या उद्देशाने कारंजा तालुक्यातील सर्व १२६ शाळा स्कूल मॅपिंग नावाच्या संगणकीय प्रणालीला जोडल्या गेल्या आहेत. या प्रणालीमुळे तालुक्यातील अत्यंत जवळची किंवा शेवटच्या टोकास असलेली शाळा तालुक्याच्या शहरापासून किती अंतरावर, कोणत्या मार्गावर, मुख्य मार्गापासून किती दूर आहे या सर्व बाबींची परिपूर्ण माहिती मिळेल. शासनाला शिक्षण विकासाची आपली योजना थेट शाळेपर्यंत सहज पोहचविता येईल. कारंंजा तालुक्यात २० माध्यमिक खासगी विद्यालये, चार स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, तीन माध्यमिक शाळांशी संलग्न असलेले कनिष्ठ महाविद्यालय, जि.प. च्या ३६ उच्च प्राथमिक आणि ५९ माध्यमिक शाळा आहेत. या सर्व शाळामध्ये कोणकोणत्या भौतिक व शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. कोणकोणत्या त्रृटी आहेत याचा शोध घेणारी यु डाईस संगणकीय प्रणाली सन २००९-१० मध्ये सुरू करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर पर्यंतच्या प्रत्येक शाळांची पटसंख्या लक्षात घेवून ३० आॅक्टोबर पर्यंतची यावर्षीची अद्यावत माहिती अपलोड केली जाणार आहे. तालुक्यात स्कूल मॅँपींग प्रणाली सुरू करण्यासाठी प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी.बी. उमेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विषयतज्ज्ञ आणि केंद्र प्रमुख शिक्षकांनी परीश्रम घेवून या दोन महिन्यात काम पूर्ण केले आहे.