शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
3
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
4
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
5
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
6
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
7
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
8
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
9
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
10
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
11
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
12
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
13
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
14
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
15
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
16
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
17
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
18
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
19
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
20
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मृतकाच्या कुटुंबाला १२.५० लाख

By admin | Updated: April 8, 2016 01:59 IST

तालुक्यातील जाम येथील पी.व्ही. टेक्साटाईल्स कंपनीमध्ये अंगावर ३७५ किलो गठाण पडून कामगार दिवाकर दत्तोबा चौधरी (५२) याचा मृत्यू झाला.

कामगारांचे कामबंद आंदोलन : दोन्ही मुलांना नोकरी, चार तासांच्या वाटाघाटीनंतर निर्णय
समुद्रपूर : तालुक्यातील जाम येथील पी.व्ही. टेक्साटाईल्स कंपनीमध्ये अंगावर ३७५ किलो गठाण पडून कामगार दिवाकर दत्तोबा चौधरी (५२) याचा मृत्यू झाला. मृतक कामगाराच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत काम करणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली. दोन हजार कामगारांनी चार तास गेटवर ठिय्या मांडला. अखेर मृतकाच्या कुटुंबाला १२ लाख ५० हजार रुपये व दोन मुलांना नोकरी देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले. यानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.
बुधवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास कामगार कच्च्या मालाच्या गठाणी मिक्सींग विभागामध्ये नेत होते. ३० ते ३५ फुट उंचीने या गठाणी मशीनद्वारे रचल्या जातात. सदर गठाणींचे वजन हे ३७५ किलोपर्यंत असते; पण उपयोगात आणण्याकरिता कामगार स्वत: त्या गठाणीला धक्का देत पैलीवर घेऊन मिक्सींग विभागात नेतात. तत्सम काम सुरू होते. गठाणीला चार कामगार पैली नेत असताना अचानक तीन गठाणी पडल्या. यातील एक गठाण थेट दिवाकर चौधरीच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतकाच्या कुटुंबाला २५ लाख रुपये, दोन मुलांना नोकरी देण्याची मागणी कामगारांनी केली होती; पण नोकरीप्रमाणे जेवढे निघेल, तेवढीच रक्कम मिळेल या निर्णयावर व्यवस्थापन ठाम होते.
अखेर गुरूवारी सकाळी कामगार नेते माजी आमदार राजू तिमांडे, अ‍ॅड. सुधीर कोठारी, पं.स. उपसभापती अशोक वांदिले, सभापती हिम्मत चतूर, प्रहारचे गजू कुबडे, नरेंद्र थोरात, महेश झोटींग, शांतीलाल गांधी, प्रदीप डगवार, जामचे उपसरपंच आशिष अंड्रस्कर तथा युवानेते सचिन गावंडे, महादेव बैलमारे, सनी निवटे, कामगार युनियनचे अध्यक्ष नरेंद्र रघाटाटे, सदस्य प्रमोद शेंडे, सुनील कणकरीया, मनीष सुरे, अरविंद गुरनुले यांच्यासह दोन हजार कामगार काम बंद करून कंपनीच्या गेटसमोर येऊन बसले.
व्यवस्थापन चर्चेला तयार झाल्यावर नेते व कामगारांच्या शिष्टमंडळाने व्यवस्थापन प्रतिनिधी पारसमल मुनोत, व्यवस्थापक भुपेंद्र शहाणे, जयंत धोटे यांच्याशी दोन तास चर्चा केली. अखेर १२ लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई देणे मान्य असल्याचे भुपेंद्र शहाणे यांनी सांगितले. या निर्णयानंतर कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेतले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त बोलविण्यात आला होता. यात हिंगणघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी आयपीएस निलोत्पाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी, समुद्रपूरचे ठाणेदार रणजीतसिंह चव्हाण, गिरडचे ठाणेदार सुखराम थोटे, हिंगणघाटचे ठाणेदार बोडखे, पोलीस उपनिरीक्षक अजय अवचट, उमेश हरणखेडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.(तालुका प्रतिनिधी)