शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

२३ एकरातील कपाशीच्या एका झाडाला १२५ बोंडे

By admin | Updated: November 4, 2014 22:45 IST

म़ गांधींची ‘खेड्याकडे चला’ ही संकल्पना साकारण्यासाठी हभप रामराम महाराज यांनी सहा महिन्यांपासून शेतात मुक्काम ठोकला़ स्वत:च्या मार्गदर्शनात त्यांनी आपल्या २३ एकर शेतात कपाशीची लागवड केली.

आदर्श शेतीकडे वाटचाल : कृषी विभागानेही केली पाहणीआष्टी (श़) : म़ गांधींची ‘खेड्याकडे चला’ ही संकल्पना साकारण्यासाठी हभप रामराम महाराज यांनी सहा महिन्यांपासून शेतात मुक्काम ठोकला़ स्वत:च्या मार्गदर्शनात त्यांनी आपल्या २३ एकर शेतात कपाशीची लागवड केली. नियोजन केल्याने कपाशीची झाडे ७ ते ८ फुट वाढली असून एका झाडाला १२५ च्या वर बोंडे आहेत़ या आदर्श शेताला कृषी अधीक्षक बऱ्हाटे यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली़ शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्याचे निर्देशही संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले़बेलोरा (खुर्द) येथील प्रगतशील शेतकरी हरिकिसन चांडक ऊर्फ रामराम महाराज यांनी आध्यात्मिक मार्गाने समाज प्रबोधनाचे नि:शुल्क काम सुरू केले. अनेक गावांत भागवत सप्ताह घेऊन लोकांना दारूच्या व्यसनातून मुक्त केले. सोबतच शेतीला चांगले दिवस यावे, तरूणांनी खेड्याकडे वळावे म्हणून रामराम महाराजांनी शेती करण्याचे ठरविले़ उन्हाळ्यापासूनच शेतात थांबून नियोजन केले. सेंद्रीय शेतीचा मार्ग निवडला. पाणी, खत, बियाणे स्वत:च ठरविल्या. प्रत्येक एकरात पाच बाय पाच फुट अंतराने एकरी ७ हजार २५० झाडे लावली. वाढीसाठी जागा मिळाल्याने व खत, पाणी भरपूर मिळाल्याने कपाशी वाढली़ निंदणाऐवजी तण नाशकाचा वापर केला़ कपाशीची झाडे १० फुट वाढावी म्हणून बांबुचा मांडव टाकणे सुरू आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे जिल्ह्यात कपाशी पिकांची पाहणी करीत आहे़ यात रामराम महाराजांची आदर्श शेती जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची असल्याचे त्यांनी सांगितले. अंबोडा येथील प्रगतशील शेतकरी अमृत देशमुख यांनी प्रती क्विंटल ४८ क्विंटल कपाशीचे उत्पन्न घेतले. यावरून महाराजांनी आदर्श शेतीचा संकल्प केला होता, असे रामराम महाराज सांगतात़ प्रती एकर ५० क्विंटल उत्पन्न घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अरुण बलसाने, तालुका कृषी अधिकारी विजय मेंढजोगे आष्टी, प्रमोद खेडकर आर्वी, व्ही.बी. महंत कारंजा यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)