शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 123 वर्गखोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

कोरोनाकाळामध्ये शाळा बंद असल्याने गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळेत गेलेच नाही. त्यामुळे या कालावधीत शाळेतील धोकादायक वर्ग खोलीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अद्यापही बांधकामाला गती मिळाली नाही. त्यामुळे वर्गखोली जैसे थेच आहे. ही अशीच अवस्था राहिली तर विद्यार्थ्यांसाठी ते धोक्याचे आहे.

ठळक मुद्देबांधकामाला मिळाली मंजूरी : १६ कोटी ४४ लाखांचा निधी उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या चार वर्षांपासून जवळपास १२३ वर्गखोल्या धोकादायक स्थिती आल्या. यापैकी १२० वर्गखोल्यांचे निर्लेखन करुन नव्याने बांधकाम करण्यास मंजुरी दिली आहे. सन २०१९-२० मध्ये ५९ वर्गखोल्यांसाठी ७. ४८ कोटींचा निधी उपलब्ध झाला. यातील १० वर्ग खोल्यांचे काम पूर्ण झाले आहे. २०२०-२१ करीता ६१ खोल्यांसाठी ८.९६ कोटींचा निधी प्राप्त झाला. परंतु अद्यापही या बांधकामाला सुरुवात झाली नाही. बांधकाम विभागाकडून कामात दिरंगाई होत आहे. 

११४ वर्गखोल्यांना दुरुस्तीची प्रतीक्षा- २०१९-२० मध्ये ११६ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यापैकी ३२ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीला मंजुरी दिली असून १ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.n २०२०-२१ मध्ये ११४ खोल्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यातील ४४ वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीला मंजुरी दिली असून त्यासाठी २ कोटी २३ लाखांचा निधी मिळाला आहे.

अशा शाळेत मुले पाठवायची तरी कशी?

कोरोनाकाळामध्ये शाळा बंद असल्याने गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळेत गेलेच नाही. त्यामुळे या कालावधीत शाळेतील धोकादायक वर्ग खोलीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अद्यापही बांधकामाला गती मिळाली नाही. त्यामुळे वर्गखोली जैसे थेच आहे. ही अशीच अवस्था राहिली तर विद्यार्थ्यांसाठी ते धोक्याचे आहे.संजय नागतोडे, पालक

शाळेतील वर्गखोली पाडून बांधण्याचे नियोजन करण्यात आल्याने त्या वर्गातील सर्व विद्यार्थी दुसऱ्या वर्गात बसविले जातात. त्यामुळे एकाच वर्गखोलीत दोन वर्गातील विद्यार्थी एकत्र बसविल्याने गोंंधळ उडतो. त्यामुळे अध्यापनावरही त्याचा परिणाम होतो. दीड वर्ष कोरोनात निघून गेले मात्र, आता शाळा सुरु झाल्यास पुन्हा तीच परिस्थिती राहणार आहे.गिरिश सावरकर, पालक 

कोणत्या तालुक्यात किती धोकादायक?

जिल्हा परिषदेच्या शाळांतील वर्गखोलीची दुरुस्ती किंवा बांधकामाबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागण्यात आले आहे. यापूर्वीच्या १२३ वर्गखोलींपैकी १२० वर्गखोल्यांच्या बांधकामाला मंजूरी देण्यात आली आहे. त्याकरिता निधीही उपलब्ध करुन दिला असून काही काम पूर्ण झाले आहे तर काहिंची प्रगतीपथावर आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण होणार आहे.संजय मेहरे, प्रभारी शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प.वर्धा.

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाSchoolशाळा