शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

११ ग्रा.पं. क्षेत्रात बांधकाम परवानगी द्या

By admin | Updated: June 16, 2014 23:40 IST

शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने २०११ पासून बांधकामाकरिता परवानगी देणे बंद झाले. यामुळे अनेक बांधकामे रखडली आहे. यासंदर्भात पाच महिन्यांपूर्वी

वर्धा : शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने २०११ पासून बांधकामाकरिता परवानगी देणे बंद झाले. यामुळे अनेक बांधकामे रखडली आहे. यासंदर्भात पाच महिन्यांपूर्वी राज्य शासनाने यावर तोडगा काढण्याकरिता निर्णय घेतला. या निर्णयानुसार तीन महिन्यात बांधकामाला परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु व्हायला हवी होती. हा घोळ संपवून रीतसर अर्जाची पूर्तता करणाऱ्या नागरिकांना बांधकामाची तत्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी किसान अधिकार अभियानच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्याकडे करण्यात आली.किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांच्या नेतृत्वात या ग्रामपंचायत क्षेत्रांतील नागरिकांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. नगरपरिषदेतील व ग्रामीण भागातील जमिनीचे व्यवस्थापन, जमीन महसूल संहिता या कायद्यानुसार अशा प्रसंगी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांची शहानिशा करण्यात आली. त्यानुसार वर्धा शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींमध्ये नवीन घरांच्या बांधकामांना १४ नोव्हेंबर २०११ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाचा ‘जैसे थे’ चा आदेश असल्यामुळे, परवानगी देणे बंद झाले. या निर्णयामुळे नागरिकांना या परिसरात बांधकाम करता येत नाही. या क्षेत्रामध्ये बांधकामाला परवानगी नसल्यामुळे चार ते पाच हजार घरांची बांधकामे थांबली आहेत. अशा परिस्थितीत शासकीय अधिसूचनेनुसार निकडीच्या परिस्थितीत विनियांचे उपबंध शिथील करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांतर्गत जिल्हाधिकारी स्तरावरुन अप्पर जिल्हाधिकारी परवानगी देण्यास सक्षम आहेत, असे काकडे यांनी यावेळी सांगितले.यासंबंधात मागील दोन वर्षांपासून नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आठ जानेवारी २०१४ ला झालेल्या वैद्यकीय या विषयावर चर्चा झाली. त्याचे इतिवृत्त ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मुंबई येथून जिल्हाधिकारी कार्यालयात २९ एप्रिल २०१४ ला पाठविण्यात आले. बैठकीत ठरल्याप्रमाणे कायद्यातील तरतुदींशी सुसंगत राहून प्रधान सचिवांच्या सल्ल्याने जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्याचे अधिकार दिले आहेत, असेही लक्षात आणून देण्यात आले.बांधकामासंदर्भातील आवश्यक परवानगी देण्याचे सर्व अधिकार कायद्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे अबाधित आहेत. तशा पद्धतीच्या सूचना राज्य शासनामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सद्य:स्थितीत नवीन बांधकामांना परवानगी देण्यास कोणतीच अडचण दिसत नाही, असेही काकडे यांनी सांगितले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी भागवत यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, यासंबंधीचा शासकीय निर्णय व कायद्यातील तरतुदीनुसार पुढील सात-आठ दिवसांत आवश्यक बांधकामाच्या मंजुरीच्या अर्जाचे प्रारुप तयार होत असून, आठ ते १० प्रकरणे नमुन्यादाखल घेऊन त्यातील त्रुटीचे निरसन करू. नियमानुसार अर्ज करणाऱ्या नागरिकांना परवानगी देणे सुरू करू, असे स्पष्ट केले. बांधकामाकरिता आवश्यक परवानगीचे कामे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरळीत सुरू होण्याकरिता किसान अधिकार अभियान नियमित पाठपुरावा करणार असून, प्रत्येक गरजू नागरिकाला रीतसर अर्जाची पूर्तता केल्यावर परवानगी मिळालीच पाहिजे, याकरिता आम्ही प्रयत्न करू, असे अविनाश काकडे यांनी उपस्थित नागरिकांना आश्वस्त केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्यासोबत शिष्टमंडळाने चर्चा केली. यात अनंत ठाकरे, मुन्ना झाडे, सुनील बडगेलवार, जितेंद्र झाडे, सुनील ठवळे, गंगाधर मुडे, प्रफुल्ल कुकडे, भाऊराव काकडे, विनायक तेलरांधे, सुधीर काहाणे, पद्माकर पिंपळे, महेश तेलरांधे, सुधीर भुते, सोनल ठाकरे आदींचा सहभाग होता.(स्थानिक प्रतिनिधी)