शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

लॅन्को चोरीप्रकरणात ११ जण अटकेत

By admin | Updated: August 17, 2014 23:19 IST

मांडवा येथील लॅन्को कंपनीत दोन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. सुरक्षा रक्षकांच्या संपकाळात झालेल्या चोरीत आठ एलसीडी व तीन फ्रिज चोरट्यांनी लंपास केले होते. त्याची एकूण किंमत

आकोली : मांडवा येथील लॅन्को कंपनीत दोन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. सुरक्षा रक्षकांच्या संपकाळात झालेल्या चोरीत आठ एलसीडी व तीन फ्रिज चोरट्यांनी लंपास केले होते. त्याची एकूण किंमत ७८ हजार रुपये होती. सदर चोरीप्रकरणी खरांगणा पोलिसात गुन्हा दाखल होता. यात आतापर्यंत पोलिसांनी अकरा आरोपींना अटक केली असून चोरीतील फ्रिज व एलसीडी जप्त करण्यात आला असून इतर मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरू आहे.लॅन्को कंपनीत सात एलसीडी व तीन फ्रिजची चोरी झाल्याची तक्रार २५ जून रोजी खरांगणा (मोरांगणा) पोलिसात करण्यात आली होती. या चोरीच्या तपासात मात्र तत्कालीन ठाणेदारांनी तपासता रूची दाखवली नाही. येथे नवे ठाणेदार म्हणून प्रशांत पांडे रूजू होताच त्यांचे लक्ष चोरीप्रकरणाकडे वळले. त्यांनी तत्काळ सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार वसंत इंगोले व त्यांच्या चमूकडे देवून तपास सुरू केला. तपासाचे धागेदोरे हाती लागताच पोलिसांनी संशयावरून आरोपींची चौकशी केली. यात आतापर्यंत या गुन्ह्यात अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. सदर चोरी प्रकरणी पोलिसांनी एक एककरिता दत्तु चिंतामण बोबडे रा. तिनखेडा, ता. सौंसर, जि. छिंदवाडा, अंकुश वाल्मीक भोंडवे, नारायण रामाजी आत्राम, धनराज मसराम, लोवेश झामरे, प्रमोद भांडवे, आकाश केंडे, देवराज बंसोड, वैभव पारीसे, सुदेश केंडे, नारायण वाघाडे यांना अटक केली. या आरोपींना पोलिसी हिसका दाखवून बोलते केले असता त्यांनी चोरीची कबुली दिली. यातील नारायण आत्राम याने पुलई येथील घरात लपवुन ठेवलेला फ्रिज व एलसीडी खरांगणा पोलिसांनी जप्त केला. चोरीतील काही वस्तु नागपुरात विकल्याची माहिती पुढे आल्याने आरोपींना नागपूर येथे नेण्यात येणार आहे. यात सहा एलसीडी व दोन फ्रिज जप्त करणे बाकी असून आरोपींची पोलीस कोठडी घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ठाणेदार प्रशांत पांडे यांंच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार वसंत इंगोले, पोलीस नायक गजानन दरणे, रवी जुगनाके तपास करीत आहे.(वार्ताहर)